Sunday, January 29, 2023

काय चाललंय तरी काय! सुमित्रा महाजन यांच्या निधनाची अफवा, अन राजकीय नेत्यांनी घाईगडबडीत श्रद्धांजली देखील वाहिली

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ताप आल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या निधनाची अफवा सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरलीय. शशी थरूर आणि सुप्रिया सुळे यांसारख्या दिग्गज नेत्यांनी त्यांना ट्विटरवरून श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर ही बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील झाली.

- Advertisement -

सर्वप्रथम शशी थरूर यांनी ट्विट करत सुमित्रा महाजन याना श्रद्धांजली वाहिली. परंतु नंतर एका युजरने त्यांना याबाबद सत्यता सांगितल्यानंतर त्यांनी लगेच ते ट्विट डिलीट केलं. परंतु तोपर्यंत इकडे सुप्रिया ताईंनी श्रद्धांजली अर्पण केली. पण हे वृत्त खोट असल्याचं समजल्यानंतर सुप्रिया सुळेंनीही ट्विट काढून टाकलंय.

येवडच नव्हे तर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील घाईगडबडीत सुमित्रा महाजन याना श्रद्धांजली वाहिली. सुधीर मुनगंटीवार यांनी फेसबुकवर पोस्ट करत सुमित्रा महाजन याना श्रद्धांजली वाहिली आणि काही वेळेतच ती पोस्ट डिलीट केली. त्यामुळे राजकीय नेत्याचं नक्की चाललय तरी काय असा प्रश्न उपस्थित होतो.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.