मराठी चित्रपटसृष्टीतील फोटोग्राफर सुधाकर मुणगेकर यांचे निधन

sudhakar munagekar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – मराठी चित्रपटसृष्टीतील सिने छायाचित्रकार सुधाकर मुणगेकर यांचे नुकतेच तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ७३व्या वर्षी निधन झाले आहे. ते अविवाहित होते. सुधाकर मुणगेकर यांनी १९६६ साली वयाच्या १८व्या वर्षी दामोदर कामत यांनी स्थापन केलेल्या ‘कामत फोटो फ्लॅश’ या कंपनीमध्ये फोटोग्राफर म्हणून रुजू झाले होते. त्यानंतर त्यांनी वयाच्या अखेरपर्यंत फोटोग्राफर म्हणून काम केले.

सुधाकर मुणगेकर यांनी त्यांच्या कारकीर्दीत अनेक चित्रपटांचे स्थिरचित्रण केले होते. तसेच त्यांनी राज कपूर यांच्या आरके बॅनर निर्मित ‘मेरा नाम जोकर’, ‘बॉबी’, ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘प्रेम रोग’, ‘धरम करम’, ‘हिना’ तसेच राजश्री प्रॉडक्शन्सच्या ‘अखियोंके झरोखेसें’, ‘नादिया के पार’, ‘सारांश’, ‘उपहार’, ‘गीत गाता चल’, ‘चितचोर’, ‘मैने प्यार किया’, एन. चंद्रा यांच्या ‘नरसिंहा’सह जवळपास दीडशेपेक्षा जास्त हिंदी चित्रपटांच्या स्टील फोटोग्राफीचे काम केले होते. त्यांनी हिंदीबरोबर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये देखील आपला ठसा उमटवला आहे.

मराठीमध्ये दामू केंकरे दिग्दर्शीत ‘सखी माझी’, कुमार सोहनी दिग्दर्शित ‘जोडीदार’, ‘तुझ्याचसाठी’ अश्या अनेक मराठी चित्रपट, नाटक, दूरदर्शन मालिकांसाठी स्थिरचित्रण केले होते. सुधाकर मुणगेकर यांनी राज कपूर साहेब, देव आनंद, राजश्री प्रॉडक्शन्सचे बडजात्या, अभिनेत्री नर्गिस, मधुबाला, दिग्दर्शिका सई परांजपे, दामू केंकरे, एन. चंद्रा, श्रीकांत ठाकरे, कुमार सोहनी, सुभाष फडके अश्या अनेक दिग्गजांसोबत काम केले होते. सुधाकर मुणगेकर यांचे कन्टीन्यूटी फोटोग्राफीमध्ये विशेष प्राविण्य होते.