प्रसिद्ध टिकटॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगट यांचं निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हरियाणातील भाजप नेत्या आणि बिग बॉस फेम, टिकटॉक स्टार सोनाली फोगट (Sonali Phogat) यांचे सोमवारी रात्री गोव्यात निधन झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या (Sonali Phogat) या अचानक झालेल्या मृत्यूने करोडो चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

भाजपने त्यांना हिसार जिल्ह्यातील आदमपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती, मात्र त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.सोनालीसमोर (Sonali Phogat) 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते कुलदीप बिश्नोई हे उमेदवार होते. भाजपच्या हरियाणा युनिटनेही त्यांची (Sonali Phogat) महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. सोनालीचे पती संजय फोगट हेदेखील भाजपचे नेते होते. त्यांच्या निधनानंतर सोनालीने (Sonali Phogat) भाजपमध्ये प्रवेश केला होता.

सोनाली यांनी (Sonali Phogat) छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. सोनाली फोगटने सोमवारी रात्रीच इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. टिकटॉकसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध असलेल्या सोनालीने बिग बॉस या रिअ‍ॅलिटी शोच्या 14 व्या सिझनमध्ये भाग घेतला होता. सोनाली फोगट या टिकटॉक स्टार आहेत. तिच्या फॉलोअर्सची संख्या लाखांमध्ये आहे. तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

हे पण वाचा :
Bandhan Bank च्या बचत खाते अन् FD वरील व्याजदरात वाढ !!!
गेट उघडायला थोडा उशीर झाला तर महिलेकडून गार्डला शिवीगाळ आणि मारहाण
आता ‘या’ सरकारी बँकेच्या ग्राहकांना FD वर मिळणार जास्त व्याज !!!
पतीला गर्लफ्रेंडसोबत पाहून भडकलेल्या पत्नीने भाजप नेत्याची रस्त्यावरच केली धुलाई
‘साला, आजकाल सीनियरिटीचं कुठं काही राहिलंच नाही’, संजय शिरसाट यांनी नाराजी बोलून दाखवली