गेट उघडायला थोडा उशीर झाला तर महिलेकडून गार्डला शिवीगाळ आणि मारहाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सोशल मीडियावर भांडणाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी नोएडामध्ये एका महिलेने रिक्षा चालकाला चोप दिल्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर आता एका महिलेने गेट उघडायला थोडा उशीर झाला म्हणून गार्डला शिवीगाळ आणि मारहाण केली (The guard was abused and beaten by the woman) आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये ?
या व्हिडीओमध्ये एका महिला सोसायटीच्या सिक्यूरिटी गार्डला मारहाण (The guard was abused and beaten by the woman) करताना दिसतेय. या व्हिडीओमध्ये ती महिला गार्डला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत आहे. त्याचबरोबर ही महिला बिहारच्या सुरक्षा रक्षकांनाही अपमानास्पद भाषेत उच्चारताना दिसत आहेत. केवळ सोसायटीचं गेट उशिरा उघडल्यानं ही महिला चिडली आणि आपला संताप तिने गार्डवर (The guard was abused and beaten by the woman) काढला.

तसेच या महिलेने गार्डचा हात धरला असून गार्ड महिलेसमोर विनवणी देखील करताना दिसतोय. मात्र, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या महिलेचा पारा इतका चढला की तिला त्याच्यावर साधी दया सुद्धा आली नाही. काही वेळाने अपशब्द वापरताना आणि गार्डची कॉलर वारंवार पकडताना (The guard was abused and beaten by the woman) ही महिला दिसून येत आहे. हा संतापजनक व्हिडिओ नोएडामधला आहे.

हे पण वाचा :
DJ च्या गाडीवर अचानक पसरला करंट; नाचता नाचता तरुणांची झाली भयंकर अवस्था
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मोठा अपघात; शिवशाही बस पलटी होऊन खड्ड्यात
Jasprit Bumrah आशिया चषक स्पर्धेला मुकणार ? समोर आलं ‘हे’ मोठं कारण
सपाच्या जिल्हा अध्यक्षांच्या गाडीला अपघात थोडक्यात बचावले, थरारक Video आला समोर
भाजप प्रदेशाध्यक्षपदी आशिष शेलारांच्या नावाची चर्चा?? तर चंद्रकांत पाटलांना…