रोहित शर्माच्या दुखापतीची CBI कडून चौकशी करा ; बीसीसीआयवर गंभीर आरोप करत कोणी केली ‘ही’ मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | टीम इंडियाचा ‘हिटमॅन’ अर्थात आक्रमक सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) याला आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळण्यात आले आहे. गुडघ्याचे स्नायू दुखावल्याने रोहित शर्मा आयपीएलमधील चार सामने खेळला नव्हता. त्यामुळे रोहितची दुखापत गंभीर असावी, असा अंदाज लावला जात होता.मात्र आयपीएलच्या साखळी फेरीतील शेवटचा सामना खेळण्यासाठी रोहित मैदानावर उतरल्याने रोहितची दुखापत गंभीर नसून तो पूर्णपणे बरा झाल्याचे स्पष्ट झाले, तरीदेखील रोहितची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड का झाली नाही? असा सवाल चाहते उपस्थित करु लागले आहेत

रोहितला भारतीय संघात स्थान का देण्यात आलं नाही, यावरुन भारताचे माजी क्रिकेटर सुनील गावसकर, ‘कर्नल’ दिलीप वेंगसरकर, माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग यांनीदेखील सवाल उपस्थित केले आहेत. त्यातच हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मैदानावर उतरुन रोहितने आपण फिट असल्याची पावती दिली आहे. त्यामुळे बीसीसीआयमध्ये रोहितबाबत राजकारण सुरु आहे का? असा सवाल नेटीझन्स उपस्थित करत आहेत. रोहितच्या एका चाहत्याने ट्विटरवर रोहितच्या दुखापतीची सीबीआयद्वारे चौकशी करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान सुनील गावस्कर यांनीही रोहितला वगळल्यानंतर निवड समितीवर टीकास्त्र सोडलं होत. रोहितला झालेली दुखापत गंभीर स्वरुपाची असती, तर तो नेट्समध्ये सराव करताना दिसला नसता. रोहितची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड का केली नाही, हे माझ्या आकलनापलीकडचे आहे. रोहितला नक्की काय झालंय, कोणत्या प्रकारची दुखापत झालीये, ज्यामुळे तो खेळू शकत नाही, या सर्व प्रश्नांची उत्तर निवड समितीने समर्थकांना द्यायला हवीत”, असं गावसकर म्हणाले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment