OnePlus Offer : तुम्ही नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चंगली संधी आलेली आहे. कारण सध्या वनप्लस स्मार्ट टीव्हीवर मोठी ऑफर दिली जात आहे. ज्यामध्ये तुमचे 15000 रुपयांपेक्षा जास्त पैसे वाचू शकतात.
दरम्यान, ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर ग्राहकांना प्रीमियम टेक ब्रँड OnePlus चे प्रिमियम स्मार्ट टीव्ही मॉडेल्स बंपर डिस्काउंटमध्ये खरेदी करण्याची संधी मिळत आहे. कंपनीचे 43-इंच स्क्रीन आकाराचे मॉडेल मूळ किंमतीच्या तुलनेत थेट 15,000 रुपयांच्या सवलतीत खरेदी केले जाऊ शकते.
वनप्लस स्मार्ट टीव्ही बेझल-लेस डिझाइनसह डॉल्बी ऑडिओ सपोर्ट देतात. याशिवाय OxygenPlay 2.0 आणि OnePlus Connect 2.0 सारख्या फीचर्समुळे हा टीव्ही केवळ स्मार्टफोनशीच कनेक्ट करता येत नाही, तर हा टीव्ही फोनवरूनही नियंत्रित करता येतो. यासोबत स्मार्ट रिमोटही उपलब्ध असून यात व्हॉईस असिस्टंट सपोर्ट असल्याने ते व्हॉइसद्वारे नियंत्रित करता येते.
या सवलतीत वनप्लस स्मार्ट टीव्ही खरेदी करा
OnePlus Y-series 43Y1S Pro 43-इंच स्क्रीन आकारासह भारतात 39,999 रुपयांच्या लॉन्च किंमतीवर लॉन्च करण्यात आला. 38% च्या थेट डिस्काउंटनंतर, हा टीव्ही Amazon वरून 24,999 रुपयांना खरेदी करता येईल. म्हणजेच या मोठ्या स्मार्ट टीव्हीवर Amazon कडून 15,000 रुपयांची सवलत दिली जात आहे. तसेच बँक आणि एक्सचेंज ऑफरसह त्याची किंमत आणखी कमी असू शकते.
ग्राहकांनी सिटीबँक कार्ड, येस बँक क्रेडिट कार्ड, वनकार्ड क्रेडिट कार्ड आणि IDFC फर्स्ट बँक क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरल्यास, त्यांना 10% पर्यंत अतिरिक्त सवलत मिळू शकते. याशिवाय जुन्या डिव्हाईसच्या बदल्यात 1,600 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट दिला जात आहे.
अशी आहेत वनप्लस स्मार्ट टीव्हीची वैशिष्ट्ये
OnePlus च्या 43-इंच स्क्रीन टीव्हीमध्ये Android TV आधारित सॉफ्टवेअर आणि 4K अल्ट्रा HD रिझोल्यूशन आहे. यात OxygenPlay 2.0 आणि OnePlus Connect 2.0 सारखे स्मार्ट कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच या स्मार्ट टीव्हीला अलेक्सा आणि गुगल असिस्टंटचा सपोर्ट मिळतो, ज्यामुळे बोलूनही ते नियंत्रित करता येते.
चांगल्या ऑडिओ अनुभवासाठी, या टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओ आणि डॉल्बी अॅटमॉस सपोर्टसह 24W क्षमतेचे ड्युअल स्पीकर आहेत. इतर कनेक्टिव्हिटी पर्यायांबद्दल बोलायचे झाल्यास, यात तीन HDMI पोर्ट, दोन USB पोर्ट आणि ड्युअल बँड वायफाय आहेत. Netflix, YouTube, Prime Video, Hotstar आणि SonyLiv सारखे अनेक OTT अॅप्स टीव्हीमध्ये उपलब्ध आहेत. अशा प्रकारे स्वस्तात हा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याची ही संधी तुम्ही सोडू नका.