Farm Related Bussiness Idea | शेतीशी संबंधित ‘हे’ व्यवसाय बनवतील लखपती, सरकार देखील करणार मदत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Farm Related Bussiness Idea | आपल्या देशामध्ये अनेक लोक विविध प्रकारचे व्यवसाय करत असतात. ज्यामध्ये त्यांना फायदा देखील होतो. परंतु आपल्या देशात मोठ्या प्रमाणात शेती हा व्यवसाय केला जातो परंतु अनेकवेळा शेतकऱ्यांच्या अशा तक्रारी असतात की, आजकाल शेतमालाला भाव मिळत नाही. त्यामुळे त्यांचे खूप मोठे नुकसान होते.

परंतु आजकाल अनेक लोक शेती करता करता देखील अनेक जोड व्यवसाय करत असतात. तर आज आम्ही शेतकऱ्यांना शेती संबंधित आणि शेतीला जोडूनच असे काही व्यवसाय सांगणार आहोत, ज्यामध्ये त्यांना खूप चांगली कमाई होईल आणि अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने ते हे व्यवसाय करू शकतात. तर जाणून घेऊयात असे कोणते व्यवसाय आहे जे शेतकरी त्यांच्या शेती सोबत करू शकतात.

बियाणे उत्पादन

बियाणी उत्पादन हा एक अत्यंत फायदेशीर व्यवसाय आहे. जर तरुणांनी हा व्यवसाय केला तर त्यांना खूप चांगला फायदा होऊ शकतो. हा व्यवसाय तुमच्या गावातील बाजारपेठेची निगडित होईल, असा प्रयत्न करा. कारण सगळेच शेतकरी बियाणांसाठी बाजारात जातात. त्याचप्रमाणे दुसऱ्या गावात जातात आणि तिथून बियाणे आणतात. परंतु हा व्यवसाय जर तुम्ही तुमच्या गावात किंवा बाजारपेठेत सुरू केला, तर तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा होईल आणि शेतकऱ्यांचा देखील वेळ वाचेल.

त्याचप्रमाणे आजकाल ऑनलाईन बिझनेस ही संकल्पना उद्यास आल्यामुळे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने याची विक्री करू शकता तुम्ही फेसबुकवर त्याचप्रमाणे इंस्टाग्रामवर याची जाहिरात करून ऑनलाईन पद्धतीने तुमची बियाणे देखील विक्री करू शकता.

कीटक औषध | Farm Related Bussiness Idea

शेतकरी पिके पेरल्यानंतर त्यांना कीटकनाशकांची फवारणी नक्कीच करतात. हा जर व्यवसाय तुम्ही केला तर त्यात तुमचे काहीच नुकसान होणार नाही. शेती व्यवसायाला याने चालना मिळेल. त्याचप्रमाणे हा दीर्घकाळ चालेल आणि प्रत्येक ऋतूमध्ये चालेल असा व्यवसाय आहे. त्यामुळे कीटकनाशकाचा व्यवसाय हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय होईल. परंतु हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला परवाना असणे गरजेचे आहे. तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन कोणत्याही माध्यमातून हा परवाना घेऊ शकता.

खत वितरण व्यवसाय

खत व्यवसाय हा शेतीशी निगडित असलेला अत्यंत महत्त्वाचा आणि जुना व्यवसाय आहे. आपल्याकडे भात, गहू, मका यांसारख्या पिकांचे सर्वात जास्त उत्पादन घेतले जाते. आणि यासाठी खतांचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत जर तुम्ही खत व्यवसाय चालू केला, तर याचा तुम्हाला खूप फायदा होईल. आणि तुम्ही नफा देखील कमवू शकता. परंतु सरकारी नियम व अटींचे पालन करून तुम्हाला त्याचा परवाना देखील काढावा लागेल.

पोल्ट्री फार्म

आजकाल शेतीसोबत पोल्ट्री फार्म हा व्यवसाय देखील वाढीस लागलेला आहे. अनेक शेतकरी शेतीची कामे करता करता हा व्यवसाय छोट्या प्रमाणात करतात. परंतु आता जर तुम्हाला खूप चांगला नफा पाहिजे असेल, तर तुम्ही हा व्यवसाय नक्कीच करू शकता. यासाठी तुम्हाला सरकारकडून अनुदान देखील मिळते.

दूध उत्पादन

अनेक शेतकरी हे शेती करता करता पाळीव प्राणी देखील पाळत असतात. त्यामुळे गाई, म्हशी यांपासून त्यांना दूध मिळते. आणि ते छोट्या प्रमाणात का होईना त्यांचा हा दुधाचा व्यवसाय चालू करतात. परंतु जर तुम्हाला खूप चांगला नफा पाहिजे असेल, तर तुम्ही मोठ्यात मोठा गोठा तयार करून हा दुधाचा व्यवसाय करू शकता. आणि तुम्ही एखाद्या मोठ्या डेरी फार्ममध्ये हे दूध नेऊ शकता आणि त्यातून तुम्हाला खूप चांगले उत्पन्न देखील मिळेल.