यवतमाळमध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

यवतमाळ : हॅलो महाराष्ट्र – यवतमाळमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. नेर तालुक्यातील मालखेड बुद्रुक या ठिकाणी हि घटना घडली आहे. प्रकाश उत्तम मानकर असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. सततच्या नापिकीपणामुळे त्यांच्यावरचे बँकेचे कर्ज वाढतच होते. यामुळे शेतकरी मानकर गेल्या काही दिवसांपासून नैराश्यामध्ये होते. याच नैराश्यातून प्रकाश उत्तम मानकर यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. याप्रकरणी नेर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

नापिकीमुळे कर्जाचा डोंगर वाढत होता
प्रकाश मानकर यांच्याकडे 10 एकर शेती आहे. त्यांनी आपल्या शेतीसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या उत्तर वाढोना शाखेतून कर्ज घेतले होते. मात्र नैसर्गिक आपत्ती आणि नापिकीमुळे त्यांना कर्जाची परतफेड करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे त्याच्यावरील कर्ज वाढतच चालले होते. त्यामुळे मानकर सतत चिंतेत असायचे.

या नैराश्यातून प्रकाश मानकर यांनी रविवारी सकाळी आपला भाऊ पुरुषोत्तम मानकर यांच्या शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी सदर शेतामध्ये धाव घेतली. यानंतर नेर पोलिस ठाण्यात घटनेची माहिती देण्यात आली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात पाठवला. प्रकाश मानकर यांच्या माघारी पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे.

Leave a Comment