आपली व्यथा मांडताना शेतकरी अजित पवारांसमोर ढसाढसा रडला, उपस्थितांचे देखील डोळे पाणावले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

यवतमाळ : हॅलो महाराष्ट्र – राज्यात काही ठिकाणी पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यातच आता विरोधी पक्षनेते अजित पवार (ajit pawar) सध्या राज्यातील अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या विदर्भातील जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. पूरग्रस्त भागात अजूनही पंचनामे झाले नाहीत. त्याठिकाणी तत्काळ पंचनामे होऊन शेतकऱ्यांना मदत होणं गरजेचं असल्याचे मत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (ajit pawar) यांनी यावेळी व्यक्त केली. हा दौरा राजकारणासाठी नव्हे तर शेतकऱ्यांसाठी असल्याचेदेखील अजित पवार (ajit pawar) यावेळी म्हणाले. या दौऱ्यादरम्यान यवतमाळ जिल्ह्यात पाहणी करत असताना व्यथा मांडताना एक शेतकरी अजित पवार यांच्यासमोर ढसाढसा रडला. यावेळी उपस्थितांच्या डोळ्यातदेखील पाणी आले.

अजित पवार यांच्यासमोरच शेतकऱ्याला अश्रू अनावर
विरोधी पक्षनेते अजित पवार (ajit pawar) सध्या अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या जिल्ह्यांचा दौरा करत आहे. याच पार्श्वभूमीवर पवार यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी मारेगाव तालुक्यातील दापोरा गावातील गुरुदेव गणपत पचारे हे शेतकरी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या समोर पुराची परिस्थिती कथन करताना ढसा ढसा रडले.

शेतकरी गुरुदेव पचारे यांची व्यथा
गुरुदेव पचारे याची नदीकाठावर 30 एकर शेती आहे. या वर्षी आलेल्या पुरापुळे शेती पूर्णपणे खरडुन गेली. त्यामुळे एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. पिकाला लागणारे 120 बॅग खत शेतातून पुराच्या पाण्यात वाहून गेले. कुकटपालन मधील 500 कोंबड्या आणि शेती साहित्य वाहून गेले. त्यामुळे तो हताश झाला. यानंतर अजित पवार (ajit pawar) पूरग्रस्त भागाचा दौरा करायला आले असताना त्याने त्यांच्यासमोर आपली व्यथा मांडली. यावेळी त्याच्या डोळ्यांत पाणी दाटून आले होते.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर