सांगली प्रतिनिधी । महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत अखेर पहिली यादी जाहीर झाली. कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील अवघ्या ५९६ शेतकऱ्यांचा समावेश आहे. म्हैसाळ येथील ३७५ आणि बनपुरी येथील बाकी थकबाकीदार शेतकरी आहेत. पहिल्या यादीत कमी लाभार्थी असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. उर्वरित याद्या टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध होणार आहेत.
दरम्यान जिल्ह्यातील ९० हजार १०७ पात्र शेतकऱ्यांच्या याद्या २८ फेब्रुवारीपर्यंत उपलब्ध होतील. त्या ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय आणि विकास सोसायटयामध्ये लावल्या जाणार असल्याचे सहकार विभागाच्यावतीने सांगण्यात आले. महाविकास आघाडीने सत्तेत आल्यानंतर अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची योजना जाहीर केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशन सुरु होण्यापूर्वी कर्जमाफीची यादी जाहीर केली जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार राज्यातील १५ हजार ३५८ पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली.
कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील म्हैसाळ आणि बनपुरी येथील आधार प्रमाणिकरणाचे कामाचा पथदर्शी योजना हाती घेतली असून या दोन गावातील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या पूर्ण झाल्या आहेत. त्यांच्या आधार प्रमाणीकरणाच्या कामाचा शुभारंभही आज झाला. सर्व शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली असून २८ तारखेपर्यंत याद्या उपलब्ध होतील. या याद्या ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, विकास सोसायटी तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संबंधित शाखेत लावल्या जातील. नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.