Business Idea : सोयाबीनपासून गुलाबजाम बनवून पठ्ठयानं कमवला पैसाच पैसा

soybean gulab jamun
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Idea शेतात पिकवत असलेल्या पिकाला भाव मिळाला नाही तर आपण तसेच बसतो. कुणी उभ्या पिकावर नांगर फिरवतो तर कुणी हतबल होतो. मात्र, एका शेतकऱ्यानं आपल्या सोयाबीन पिकाला भाव मिळण्याची वाट न बघता त्यापासून प्रक्रिया उद्योग सुरु करण्याचा निर्णय घेतला. आणि पुढे जाऊन त्याने सोयाबीनपासून गुलाबजामून आणि पनीर बनवून पिकासोबत पदार्थ विकून पैसेच पैसे कमवू लागला आहे. हिंगोली जिल्ह्यातील कवडा गावातील शेतकरी निरंजन कुटे यांनी हे करून दाखवले आहे.

सोयाबीन हे हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख पीक. परंतु सोयाबीन पिकाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने येथील शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकावर प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला येथील शेतकरी निरंजन कुटे यांनी सोयाबीनपासून गुलाबजामून आणि पनीर निर्मिती करण्यास सुरुवात केली. आज त्यांना या प्रक्रिया उद्योगातून पनीरला 250 रुपये किलो तर गुलाब जामून ला 200 रुपये किलो भाव मिळत आहे.

Soybean

शेतकरी मित्रानो, तुम्हाला सुद्धा तुमच्या शेतातून घेत असलेल्या सोयाबीन, केळी, बटाटे आदी पिकांवर प्रक्रिया करून त्यापासून जोडधंदा करून अशा प्रकारे चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करा त्यातून तुम्हाला नवनवीन व्यवसायाबद्दल माहिती मिळेल आणि त्यातून तुम्हीही स्वतःचा व्यवसाय करू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे ॲप Download करून Install करा. याव्यतिरिक्त Hello Krushi मध्ये तुम्हाला सातबारा उतारा, जमीन मोजणी, बाजारभाव, हवामान अंदाज यांसारख्या सुविधाही मिळतील. त्यासाठी हॅलो कृषी डाउनलोड करा.

Hello Krushi हे अँप Download करण्यासाठी Click Here

सोयाबीन02

1 एकर शेतात 11 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन

कवडा गावातील अल्पभूधारक शेतकरी असलेल्या निरंजन कुटे यांनी पानी फाउंडेशनच्या माध्यमातून शेतात सोयाबीनची लागवड केली. त्यांनी 1 एकर शेतात 11 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन घेतले. परंतु पिकाला भाव मिळत नसल्याने त्यांनी सोयाबीन सोयाबीन घरीच ठेवले. एकीकडे कमी भाव असल्याने एवढ्या सोयाबीनचे करायचे काय? याची चिंता त्यांना अलागून राहिली होती. असा परिस्थितीत त्यांना सोयाबीनपासून प्रक्रिया करण्याची आयडिया सुचली. यासाठी वेळ जाणार होता. मात्र, त्यांनी ठरवलं कि आपण प्रक्रिया उद्योग सुरु करायचाच.

सोयाबीन

पाणी फाउंडेशनकडून घेतलं प्रशिक्षण

निरंजन कुटे यांनी पाणी पानी फाउंडेशनकडून सोयाबीनपासून पनीर आणि गुलाब जामुन निर्मितीचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणानंतर त्यांच्या हे लक्षात आले की, यातूनही जास्त पैसे मिळू शकतात. हे लक्षात येताच त्यांनी सोयाबीन प्रक्रियेपासून गुलाब जामून आणि पनीरची घरीच निर्मिती सुरू करायचा निर्णय घेतला. आणि हा प्रयोग सुरुही केला.

सोयाबीन 03

अशा प्रकारे सोयाबीनवर केली प्रक्रिया

निरंजन कुटे यांनी प्रशिक्षण घेतल्यानंतर सुरुवातीला घरातील सोयाबीन दळून आणले. सोयाबीन दळून घेतल्यानंतर सोयाबीनचे पीठ एका भांड्यात मळले. त्यानंतर साखरेसह इतर पदार्थ टाकून मिश्रण तयार करून गोळे तयार केले. आणि साखरेच्या पाकातून गुलाबजामून तयार केले एक किलो सोयाबीनपासून दीड ते 2 किलो गुलाब जामून तयार होतात. 200 रुपये किलोप्रमाणे या गुलाबजामूनची मागणी आहे.

 Farmer hingoli soybean Gulab Jamun

पनीर तयार करताना घेतली ‘ही’ काळजी

सोयाबीनपासून पनीर तयार करण्यासाठी निरंजन यांनी सुरुवातीला सोयाबीन रात्रभर पाण्यामध्ये भिजवत ठेवले. त्यानंतर भिजवलेले सोयाबीन मिक्सरमध्ये बारीक केले. सोयाबीन बारीक केल्यानंतर त्यापासून सोयाबीनचे दूध तयार झाले. हे दूध सुती कपड्याच्या सहाय्याने चाळून घेतले. आणि त्यानंतर चाळलेले दूध चुलीवर गरम केले. उकळलेल्या दुधामध्ये लिंबाचा रस टाकल्यानंतर ते दूध फाटले. आणि त्या दुधाचे पनीर तयार केले. सोयाबीनच्या एक किलो दुधापासून एक किलो 200 ग्रॅम इतक्या पनीरची त्यांनी निर्मिती केली. हे पनीर 250 रुपये किलोप्रमाणे विक्री होते.