हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | कर्नाटकमधील नालुरु गावातील शेतकरी श्रीकांता गौडा यांच्या शेतातील पीक माकड उद्धवस्त करत होती. श्रीकांता यांनी माकडांना पळवून लावण्याचे केलेले सर्व प्रयत्न निरर्थक ठरले. एक दिवस त्यांना आठवले की भटकळ जिल्ह्यात एका शेतकऱ्याने शेतात खेळण्यातले मोठे वाघ ठेवल्यानंतर त्याच्या शेतात माकडं येणे बंद झाले.
श्रीकांता यांनी हाच प्रयोग करून पहाण्याचे ठरवले. पण यासाठी खेळण्यातले वाघ न वापरता पाळलेल्या कुत्र्यालाच वाघासारखे रंगवले आणि शेतात सोडले; काम झाले ! माकडं पळून गेली. नंतर हा रंगवलेला वाघ माकडांना नेहमी श्रीकांता यांच्या शेतात फिरतांना दिसायचा. वाघाला घाबरून माकडांनी श्रीकांता यांच्या शेतात येणे बंद केले.
श्रीकांता यांनी कुत्र्याला रंगवण्यासाठी लावलेला डाय १ महिन्यात फिक्का पडू लागला. मग श्रीकांता यांनी रंगवलेल्या वाघाचे मोठे फोटो काढून शेतात लावाले. अजूनही त्यांच्या शेतात माकडं येत नाहीत