PM Kisan FPO Yojana: ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 15 लाख रुपये; इथे करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील शेतकऱ्यांना (PM Kisan FPO Yojana) आर्थिक बाबतीत सक्षम करण्यासाठी आणि त्याला फायदा होण्यासाठी केंद्र सरकार लसूण वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. आपल्याला सर्वाना पंतप्रधान किसान सम्मान योजना तर माहित आहेच, या योजनेच्या माध्यमातून आपल्याला वर्षाला 6 हजार रुपये मिळतात. परंतु मोदी सरकारने आता यापुढे जाऊन आता शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी पीएम किसान एफपीओ योजना सुरू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत सरकारकडून शेतकऱ्यांना नवीन कृषी व्यवसाय सुरू करण्यासाठी 15 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.

कोणाला होणार PM Kisan FPO योजनेचा लाभ ?

या योजनेचा (PM Kisan FPO Yojana) लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना मिळून एक संस्था किंवा कंपनी (FPO) स्थापन करावी लागेल, यामध्ये कमीत कमी 11 शेतकरी असणे आवश्यक आहे. मुख्य म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. याद्वारे शेतकरी शेतीशी संबंधित उपकरणे किंवा खते, औषधे आणि बियाणे यासारख्या गोष्टी खरेदी करू शकतील. 2023-24 पर्यंत 10 हजार एफपीओ तयार करण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे.

शेतकरी मित्रानो, तुम्हालाही सरकारच्या सर्व योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर कोणत्या महा ई -सेवेत जाऊन चकरा मारण्याची गरज नाही. आत्ताच Hello Krushi हे अँप तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा आणि घरबसल्या सर्व सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करा. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला 1 रुपयाही खर्च करावा लागणार नाही. हॅलो कृषीमध्ये या व्यक्तिरिक्त, जमीन मोजणी, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज, सातबारा उतारा यांसारख्या अनेक सुविधा अगदी फुकटात मिळत आहेत. याशिवाय हॅलो कृषी अँप वर तुम्ही पिकवलेला शेतमाल तुम्हाला हव्या त्या किमतीत विकू शकता. यासाठी आत्ताच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन हॅलो कृषी डाउनलोड करा.

Hello Krushi डाउनलोड करण्यासाठी Click Here

योजनेसाठी अर्ज कसा करावा – (PM Kisan FPO Yojana)

सर्वप्रथम, तुम्हाला भारत सरकारच्या राष्ट्रीय कृषी बाजाराच्या (https://www.enam.gov.in) अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
यानंतर, होम पेजवर दिलेल्या FPO पर्यायावर क्लिक करा. तुमच्यासमोर नोंदणी आणि लॉगिनचा पर्याय दिसेल. यामधील नोंदणीचा ​​पर्याय निवडा.
आता तुमच्या समोर एक फॉर्म उघडेल, ज्यामध्ये मागितलेली सर्व माहिती भरावी लागेल.
यानंतर तुम्हाला पासबुक किंवा रद्द केलेला चेक किंवा आयडी स्कॅन करून अपलोड करावा लागेल.
त्यानंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करा.

नोंदणीसाठी, तुम्हांला FPO चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), व्यवस्थापकीय संचालक (MD) किंवा व्यवस्थापक यांचे नाव, पत्ता, ई-मेल आयडी आणि संपर्क क्रमांक प्रदान करावा लागेल. तसेच यासंबंधीची कागदपत्रेही द्यावी लागतील. याशिवाय FPO च्या उच्च अधिकाऱ्यांचे बँक डिटेल्सही द्यावे लागतील. यामध्ये बँकेचे नाव, शाखा, खाते क्रमांक आणि IFSC कोडचा समावेश असेल.