‘या’ योजनेअंतर्गत शेतकऱ्याला मिळत आहेत दरमहा 3 हजार रुपये; अर्ज प्रक्रियेची जाणून घ्या सविस्तर माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. यातील महत्वाची योजना ही “किसान मानधन योजना” (Kisan Mandhan Yojana) आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 3 हजार रुपये इतकी पेन्शन देण्यात येते. मात्र या योजनेसाठी केवळ 18 ते 40 वयोगटातील शेतकरी पात्र आहे. या योजनेअंतर्गत, लाभार्थी शेतकऱ्याचे वय 60 वर्षे झाले की त्याला दरमहा 3 हजार रुपये पेन्शन देण्यात येते. ज्यामुळे उतरत्या वयात या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना सर्वात जास्त होतो. चला तर मग जाणून घेऊया
किसान मानधन योजनेविषयची अधिक माहिती.

किसान मानधन योजनेअंतर्गत शेतकऱ्याला दरमहा तीन हजार रुपये देण्यात येत आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी अधिकृत साईडवर जाऊन नोंदणी करावी. मुख्य म्हणजे या योजनेसाठी फक्त 18 ते 40 वयोगटातीलच शेतकरी अर्ज करू शकतात. यानंतर गुंतवणुकीची रक्कम लाभार्थ्याच्या वयोमर्यादेनुसार ठरवली जाते. जसे की, तुम्ही जर 40 व्या वर्षी या योजनेसाठी नोंदणी केली तर तुम्हाला दरमहा 200 रुपये गुंतवावे लागतील. तसेच तुम्ही 18 वर्षी या योजनेसाठी नोंदणी केल्यास तुम्हाला दरमहा 55 रुपये गुंतवावे लागतील. पुढे तुम्ही 60 वर्षाचे झाल्यावर तुम्हाला दरमहा 3 हजार रुपये पेन्शन सुरू केली जाईल.

मानधन योजनेसाठी पात्रता

मानधन योजनेसाठी फक्त 18 ते 40 वयोगटातील शेतकरी अर्ज करू शकतात. तसेच ज्या शेतकऱ्यांची दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन आहे, असे शेतकरी देखील अर्ज करण्यास पात्र असतील. या योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या गुंतवणुकीची मर्यादा लाभार्थी शेतकऱ्याच्या वयानुसार ठरवण्यात येते. पुढे लाभार्थ्याचे वय 60 वर्षे झाल्यानंतर त्याला तीन हजार रुपये पेन्शन सुरू होते. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, मोबाईल नंबर पासपोर्ट आकाराचा फोटो, ओळखपत्र, वय प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, बँक खाते पासबुक असे सर्व कागदपत्रे जवळ असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराकडे दोन हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी लागवडी योग्य जमीन असणे गरजेचे आहे. या योजनेविषयीची अधिकची माहिती https://maandhan.in/ या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे.