“ओ साहेब, दोन लाखांचं कर्ज काढलंय; एवढं पीक झाल्यावर घ्या ना जमीन..!!” गुनामधील शेतकरी दाम्पत्याने पोलिसांच्या मारहाणीनंतर पिलं तणनाशक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मध्यप्रदेश मधील गुना जिल्ह्यातील जगनपुर भागात वाट्याने शेती करणाऱ्या एका दलित शेतकऱ्याला आणि त्याच्या पत्नीला सायन्स कॉलेजसाठी देण्यात आलेली जमीन खाली करण्यासाठी पोलिसांकडून बेदम मारहाण करण्यात आली. राजकुमार अहिरवार असं पीडित शेतकऱ्याचं नाव असून त्याला आणि त्याच्या पत्नीला पोलिसांनी बेदम मारहाण केल्यानंतर दोघांनीही कीटकनाशक पिऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. सध्या दोघांचीही प्रकृती स्थिर असून दोघांवर दवाखान्यात उपचार सुरु आहेत.

राजकुमार कसत असलेली जमीन त्यांना वाट्याने करण्यासाठी देण्यात आलेली आहे. या जमिनीत कष्ट करुन काहीतरी उगवावं या हेतूने त्यांनी पेरणी केली होती, आणि चांगलं पीकही उगवून आलं होतं. मात्र सदर जागा कॉलेजसाठी प्रस्तावित असल्याचं सांगत पोलिसांकडून जेसीबी लावून या शेतातील पिकांचं नुकसान करण्यात आलं. “यंदा कर्ज काढून शेत पिकवलय साहेब, एवढं पीक आलं की घ्या जमीन..आता जेसीबी चालवू नका” अशी आर्त विनवणी करणाऱ्या राजकुमारला आणि त्याच्या पत्नीला न जुमानता याठिकाणी जेसीबी चालवून शेत उध्वस्त करण्यात आलं.

https://twitter.com/Gandhi_Rahul_/status/1283413432289472512?s=19

पोलिसांनी हे पाऊल उचलल्यानंतर संतापलेल्या राजकुमार यांनी पोलिसांशी हुज्जत घातली तेव्हा पोलिसांकडून त्यांना आणि त्यांच्या पत्नीला बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचं चित्रीकरणही लोकांनी केलं असून ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मारहाणीनंतर राजकुमार आणि त्यांच्या पत्नीने शेतशेजारील झोपडीत (राहत्या घरात) ठेवलेलं तणनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या शेतकरी दाम्पत्याला ६ लहान मुलं असून औषध पिल्यानंतर या मुलांनी आईबापाला कवटाळून बसत आपला आक्रोश व्यक्त केला.

पोलिसांकडून शेतकरी दाम्पत्याला सुरु असलेली मारहाण

https://twitter.com/Anas__Khan/status/1283440636667080704?s=19

स्थानिक तहसीलदार निर्मल राठोड यांच्या मते, शेतकऱ्यांनी अरेरावी केल्याने पोलिसांना लाठी चालवावी लागली. दरम्यान या प्रकारामुळे देशभरातील नागरिकांकडून मध्यप्रदेश पोलिसांवर कारवाईची मागणी होत आहे. शिवराजसिंग चौहान यांच्या राज्यात अशा प्रकारचा गुंडाराज पोलिसांकडून चालवला जात असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा यासाठी #शिवराज_सिंह_इस्तीफा_दो’ हा ट्विटर ट्रेंडही चालवला जात आहे.

कॉलेजसाठी जागा मंजूर होऊन बरेच दिवस झाले असून आता कॉलेज बांधलं नाही तर ते दुसऱ्या ठिकाणी हलवलं जाईल. शेतकरी दाम्पत्याने कीटकनाशक पिलं ही दुर्दैवी घटना असून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्हाधिकारी एस. विश्वनाथन

Leave a Comment