औरंगाबाद । जिल्ह्यात प्रशासनाने अंशतः लॉकडाऊन जाहिर केले आहे. प्रशासनाच्या निर्णयानुसार ११ ते १७ मार्चपर्यंत जाधववाडी बाजार समिती बंद राहिली तर भाज्या आणि फळे कुठे विकावेत? असा संतप्त प्रश्न शेतकऱ्यांनी केला आहे. या काळात आम्ही नाशवंत भाजीपाला आणि फळांचे करायचे काय? त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
शेतकऱ्यांनी बाजार समिती सभापतींना भेटून आपले गाऱ्हाणे मांडले आहे. सात दिवस बाजारपेठा बंद राहतील तर शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होईल हजारो टन माल गुरांना चारावा लागेल भाजीपाला हा नाशवंत असतो त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होतील म्हणून नियमांचे काटेकोर पालन करू पण बंदीचा निर्णय मागे घ्या अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा