हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या ऊसतोडणी सुरु असल्यामुळे ग्रामीण भागात उसाच्या फडात तोडकऱ्यांच्या कोयत्यांचे आवाज येऊ लागले आहेत. ऊसतोडीसोबत जास्तीत जास्त ऊस कशाप्रकारे तोडला जाईल, याकडे तोडकरी लक्ष देत आहेत. ऊस तोड करत असताना कहाणी तोडकरी मजुरांकडून विक्रमही केले जात आहेत. असाच एक विक्रम जत तालुक्यातील खैराव येथील राहणारे ऊसतोड मजूर ईश्वर सांगोलकर यांनी केला आहे. त्यांनी तळपणाऱ्या उन्हात तब्बल बारा तासांत 17 टन 300 किलो ऊस तोडण्याचा विक्रम केला आहे. त्यांच्या या विक्रमाची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा होत आहे.
शेतकरी मित्रांनो सध्या अनेक शेतकरी तंत्रज्ञानाचा वापर करून हायटेक शेतीतून आपला नफा दुप्पट करत आहेत. यासाठी Hello Krushi अँप शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची भूमिका पार पाडत आहे. नवनवीन तंत्रज्ञान, उपकरणे यांची माहिती या अँपवर आहे. तसेच प्रगतिशील शेतकऱ्यांनी शेतीत केले अनेक प्रयोग, कृषी विद्यापीठांमधील नवनवीन संशोधनाची माहिती यावर दिली जाते. तसेच शेतकरी ते ग्राहक अशी थेट खरेदी विक्रीही या अँपच्या माध्यमातून करता येते. तुम्हीही स्वतः अनेक पिकाची माहिती घेत उत्तम शेती करू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे ॲप Download करून Install करा. याव्यतिरिक्त Hello Krushi मध्ये तुम्हाला सातबारा उतारा, जमीन मोजणी, बाजारभाव, हवामान अंदाज यांसारख्या सुविधाही मिळतील. त्यासाठी हॅलो कृषी डाउनलोड करा.
Hello Krushi हे अँप Download करण्यासाठी Click Here
पहाटे ऊसाच्या फडात दाखल
चार दिवसांपूर्वी खैराव गावातील शेतकरी पांडुरंग चौगुले यांच्या मालकीचा ऊस तोडण्याचा निर्णय ईश्वर सांगोलकर यांनी घेतला. हातात कोयता घेत ते सकाळी सहा वाजण्याच्या ठोक्यावर उसाच्या फडात दाखल झाले. हातातील कोयता उंचावत त्यांनी ऊसतोडीस सुरुवात केली. पांडुरंग चौगुले यांच्या शेतात सुरु केलेल्या ऊसतोडीत ईश्वर यांच्या कोयत्यानेही त्यांना अमोलाची साथ दिली. सरसर करत बारा तासात तब्बल 17 टन 300 किलो ऊस एकट्या पट्टयाने तोडला.
कारखान्याच्या अधिकाऱ्याकडून दखल
एका ऊसतोड मजूर शेतकऱ्याने केलेल्या या विक्रमाची चर्चा सबंध तालुक्यात पसरली. त्याच्या विक्रमाची बातमी राजारामबापू कारखान्याच्या अधिकाऱ्यांच्या कानावर पडली. यावेळी कारखान्याचे अधिकाराची आणि कर्मचारी कारखान्याच्या जीपमधून तातडीने जाऊन ऊसतोड करत असलेल्या ईश्वर सांगोलकर यांचा हार घालून सत्कार केला.
उसाच्या फडात जाऊन केला सत्कार
ईश्वर सांगोलकर यांनी केलेल्या विक्रमाबद्दल कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी सत्कार केल्यानंतर त्यांच्या कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे. त्यांच्या विक्रमाची माहिती समजताच सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी देखील उसाच्या फडात जाऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी माजी सरपंच मारुती जमदाडे, उपसरपंच विश्वास खिलारे, नवनाथ चौगुले आदी उपस्थित होते.
वीस वर्षांपासून उसतोडीचे काम
आपल्या अंग मेहनतीच्या बळावर ऊसतोडीचा विक्रम करणारे ईश्वर सांगोलकर हे गेली वीस वर्षापेक्षा अधिक काळ ऊस तोड करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. अंग मेहनत करणाऱ्या ऊसतोड मजुरांना शासनाकडून सुविधा देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन यावेळी संचालक प्रकाश जमदाडे यांनी सांगोलकर यांना दिली.
ऊसतोडीचा विक्रम करण्याची केली होती जिद्द
वारणा पट्टयात 12 तासात 16 टन ऊसतोडीला विक्रम पाठीशी असलेल्या खैरावचे सुपुत्र ईश्वर सांगोलकर यांना आपल्या भागात ऊसतोडीचा विक्रम करण्याचा मानस होता. वाहन मालक नवनाथ चौगुले यांना त्यांनी आपला मनोदय बोलून दाखवत एका दिवसात एकटा किती टन ऊसतोड करतो बघा, असा आग्रहच ईश्वर सांगोलकर यांनी धरला. वाहन चालक नवनाथ चौगुले यांनीही ईश्वर यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.