हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : दिवसेंदिवस कांद्याच्या दरात मोठी घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कमी दरामुळे त्यांनी घातलेला खर्च देखील निघत नाही. अशात नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत सकाळी लिलाव प्रक्रिया सुरु होताच कांद्याला कमी दर मिळाला. त्यामुळे आक्रमक झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन करत थेट लिलावच बंद पाडले.
नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये राज्य कांदा उत्पादक संघटनेच्यावतीने आज सकाळी सुरू झालेली लिलाव प्रक्रिया बंद पाडण्यात आली. यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. जोपर्यंत कांद्याला 15 ते 20 रुपये अनुदान मिळत नाही तोपर्यंत लिलाव होऊ देणार नाही आणि टप्प्याटप्प्याने राज्यातील बाजार समिती बंद पडणार, अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी यावेळी घेतली.
शेतकरी मित्रांनो आपण आपल्या शेतात घेत असलेलया शेतमालास किती दर मिळाला आहे. हे रोजचे बाजारभाव चेक करणे खूप गरजेचे आहे. यामुळे भाव कधी वाढले? किती रुपयांनी वाढले यासोबतच सर्वाधीक भाव कुठे मिळत आहे यानुसार आपण आपला शेतमाल विक्री करून अधिक नफा कमावू शकतो. गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi या मोबाईल अँपच्या मदतीने आता शेतकरी स्वतः आपल्याला हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजार समितीमधील ताजा बाजारभाव चेक करू शकतो. तुम्हीही या अतिशय महत्वाच्या सेवेचा मोफत लाभ घेण्यासाठी आजच तुमच्या मोबाईलवर Hello Krushi अँप डाउनलोड करून घ्या.
Hello Krushi हे अँप Download करण्यासाठी Click Here
कांद्याला फक्त 400 ते 450 रुपयांचा दर
आज नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत सकाळी लिलाव प्रक्रिया सुरु झाली. लिलावास सुरुवात होताच शेतकऱयांनी आपापले कांदे बाजार समितीत आणलेले. मात्र, शेतकऱ्यांच्या कांद्याला कमीत कमी 200 जास्ती जास्त 800 रुपये तसेच सरासरी 400 ते 450 रुपयांचा दर मिळाला. त्यामुळे आज कांद्याच्या दरात घसरण दिसून आली. दरम्यान, कांद्याच्या दरात रोजच घसरण होत असल्याने राज्य कांदा उत्पादक संघटनेने आजची लिलाव प्रक्रिया बंद पाडली.
अर्थसंकल्पात सरकारने कांद्याला चांगल्या दराची घोषणा करावी
नाशिक येथे शेतकऱ्यांनी कांद्याला 1500 रुपये अनुदान मिळावे. सध्या सुरू असलेल्या लिलावात कांद्याला 15 ते 20 रुपयाने खरेदी करावा. यावेळी आजच्या अर्थसंकल्पात सरकारने कांद्याला चांगल्या दराची घोषणा करावी. अन्यथा लिलाव सुरू होऊ देणार, नाही, असा असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.