सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
भारत देशात महाराष्ट्र राज्यातील दुष्काळी समजल्या जाणाऱ्या माण तालुक्यातील शेतक-यांच्या पीकाची आता पाहणी रोबोट करणार आहे. भारतातील शेती रोबोटचा पहिला वहिला प्रयोग माण तालुक्यात होत असल्याने शेतकऱ्यांच्यात कुतुहूल आहे. दुष्काळी समजल्या जाणा-या माण तालुक्यातील शेतक-यांना जागतिक स्तरावरील अधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा लाभ देण्यात येत आहे.
यासाठी माणदेशी फौंऊंडेशनच्या माध्यमातून अमेरिकेतील अत्याधुनिक स्वयंचलीत रोबोटच्या साह्याने पिकाची पाहणी करुन पिकावरील रोगाचा प्राद्रुर्भाव व पिक वाढीस गरजेची असलेली खतांची मात्रेची अचुक माहिती दिली जाणार आहे. या रोबोट शेतीचे प्रात्यक्षिक माण तालुक्यातील शेतक-यांना दाखविण्यात आले. शेतक-यांच्या पिकाच्या ऊत्पन्न वाढीसाठी शेतातील पिकांची पहाणी करुन संबंधित पिकावर कोणकोणत्या रोगाचा प्रादु्र्भाव झाला आहे. पिकाचा रंग ऊंची व संबंधित पिक वाढीस कोणकोणत्या अन्यद्रव्य खतांची गरज आहे. याचे अचुक विश्लेषण करणारे सॉफ्टवेअर विकसित करुन याचा स्वयंचलीत रोबोट तयार केला आहे. हा चारचाकी रोबोट पिकात फिरुन पाहणी करतो.
आता रोबोट करणार शेततकऱ्याला कामात मदत pic.twitter.com/mdfAEJuxI1
— Hello Krushi (@HelloKrushi) January 17, 2023
या रोबोटमध्ये ठिकठिकाणी स्वयंमचलीत कॅमेरे असून कॅमेऱ्याच्या साह्याने पिकाचे चित्रण करुन पिकाची ऊंची, रंग, जाडी याचेसह पिकावर कोणत्या किड व रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे किंवा संभाव्य आहे. या संदर्भातील माहिती रोबोटमधील सॉफ्टवेअरला देताच या माहितीचे अचुकरित्या विश्लेषण करुन हा रोबोट पिकाच्या वाढीसाठी आवश्यक अशी आगाऊ माहिती देतो. अमेरिका, ब्राझील, आस्ट्रेलिया देशात 120 रोबोट सध्या हे काम करतायेत.