अनुचित जाती जमातीतील शेतक-यांनी कृषी योजनाचा लाभ घ्यावा : सभापती संजय गायकवाड

Mahableshwer Panchyat Samiti
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

महाबळेश्वर प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

महाबळेश्वर तालुका पंचायत समिती कृषी विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना तर अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना सन २०२१-२२ करीता अर्ज मागविण्यात येत आहेत.

या योजनेमधून शेतकऱ्यांना नविन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, विज कनेक्शन, विद्युत पंप संच, शेत तळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण व सूक्ष्म सिंचन याबाबींचा पॅकेज स्वरुपात लाभ देण्यात येणार आहे. नविन विहीरींचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावे कमित कमी ०.४० हेक्टर (एक एकर) क्षेत्र असणे आवश्यक आहे. इतर बाबींसाठी ०.२० हेक्टर ( अर्धा एकर) क्षेत्र असणे आवश्यक आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी खाते उताऱ्यासह सर्व ७/१२ उतारे, सक्षम अधिकाऱ्याचा जातीचा दाखला, रु. १,५०,००० च्या आतिल उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड झेरॉक्स, बॅंक पासबुक झेरॉक्स, ग्रामसभा ठराव तसेच नविन विहिर लाभ घेण्यासाठी यापूर्वी शासकीय विहीर योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रांसह महाडीबीटी पोर्टलवर (https:mahadbtmahait.gov.in) ऑनलाईन नोंदणी करावी व अर्ज पंचायत समिती महाबळेश्वर कृषि विभागात सादर करावा, असे आवाहन सभापती संजय गायकवाड, गटविकास अधिकारी अरुण मरभळ व कृषि अधिकारी एस.के.चिरमे यांनी केले आहे.