विश्वास नांगरे पाटील म्हणजे महाविकास आघाडीचे माफिया; किरीट सोमय्यांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपकडून सध्या अनेक कारणांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,शिवसेना व महाविकास आघाडीवर निशाना साधला जात आहे. तर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याकडून आघाडीतील नेत्यांना टार्गेट केले जात आहे. दरम्यान सोमय्यांनी आज थेट सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यावरच आरोप केला आहे. “सध्याचे सह पोलीस आयुक्त असलेले विश्वास नांगरे पाटील हे महाविकास आघाडी सरकारचे माफिया आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याकडून दररोज खळबळजनक खुलासे केले जात असून अनेकांवर थेट आरोपही केले जात आहेत. दरम्यान त्यांनी खासदार भावना गवळी यांना अटक करावी, अशी मागणी केल्यानंतर त्यांनी आता थेट सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. “मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे ठाकरे सरकारचे माफिया म्हणून काम करत आहेत. पाटील यांनी गैरकायदेशीरपणे मला घरात कोंडून ठेवले असा आरोपही सोमय्यांनी यावेळी केला.

यावेळी सोमय्या म्हणाले की, मुंबईचे सहपोलीस आयुक्त असलेले विश्वास नागरे पाटील यांच्याविरोधात आपण केंद्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रारही दाखल करणार आहे. कारण पाटील यांनी मला सीएसटी स्टेशनच्या बाहेर कोंडून ठेवले. एज्युकेटेड अधिकारी आहेत. मात्र, नांगरे-पाटील हे माफिया सारखे वागत असल्याची टीकाही सोमय्यांनी केली आहे.