कराडला शुक्रवारी शेतकरी संघटनाचा वीज वितरणवर आक्रोश मोर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

वीज वितरण विरोधात सर्व शेतकरी संघटना एकवटल्या असून शुक्रवार दि. 28 रोजी विविध मागण्यांसाठी वीज वितरणच्या कराड शहर कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. शेती पंपांना मोफत वीज द्या व थकीत बिलापोटी शेती पंपाची तोडलेली वीज तात्काळ जोडा, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

पत्रकार परिषदेस बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रिय अध्यक्ष पंजाबराव पाटील, शेती मित्र अशोकराव थोरात, स्वाभिमीनी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, शेतकरी नेते अनिल घराळ, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, रयत संघटनेचे तालुका अध्यक्ष अशोक लोहार, शेकापचे अॅड. समिर देसाई, उत्तम खवाले, सुनील कोळी, विश्वास जाधव, आनंदराव थोरात, रामचंद्र साळुंखे, मनोज हुवाले, अविनाश फुके, नजीर पटेल, कृष्णत जगताप, सागर कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

पंजाबराव पाटील म्हणाले, वीज वितरणची शेतकऱ्यांबाबतची धोरणे अत्यंत अन्यायकारक व चुकीची आहेत. उद्योगांची लोखो रूपयांची वीज बिले थकीत असताना कारवाईचा बडगा मात्र शेतकऱ्यांवर उगारला जातो. उद्योगांना दिवसा वीज आणि शेतकऱ्यांना रात्री. शिवारात बिबटे, साप, विंचू यांचा धोका असताना शेतकरी दिवसभर काबाडकष्ट करून शेतीला पाणी देण्यासाठी रात्री दोन वाजता शेतात जाणार हा शेतकऱ्यांवर अन्याय करणार आहे.

अशोकराव थोरात म्हणाले, चुकीच्या पध्दतीने शेतकऱ्यांकडून वीज आकारणी केली जात आहे. शेतकऱ्यांना कर्नाटक, तेलंगणा या प्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोफत वीज दिली पाहिजे. राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सकारात्मकता दाखवली पाहिजे.

Leave a Comment