राज्यातील शेतकऱ्यांना अवघ्या 2 रुपयात वीज मिळणार; राज्य सरकारची मोठी घोषणा

Farmer News
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. राज्य सरकारने (State Government) लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तोंडावर शेतकऱ्यांना अवघ्या दोन रुपयात वीज मिळेल अशी घोषणा केली आहे. त्याचबरोबर वीज कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि त्यांच्या अडचणीत सरकार तातडीने सोडवेल, असा विश्वास स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिला आहे. आता सरकार फक्त दोन रुपयात वीज देणार असल्यामुळे याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आज माहिती दिली की, सरकारने आतापर्यंत दीड लाख पंप दिले आहेत. परंतु आपण एका वर्षामध्ये आठ लाख सोलार पंप मंजूर करून निधीचा पुरवठा करणार आहे. सरकार ज्यांना गरज आहे त्यांना सोलर पंप उपलब्ध करून देईल. सध्या राज्य सरकारकडे आठ लाख सोलर पंप आहेत, तर या सोलरची मागणी पाच लाख रुपयांपर्यंत आहे. आम्ही शेतकऱ्यांना रात्रीच्या विजेचे संकट संपवू असे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे आम्ही ते पूर्ण करणार आहोत. सरकारी या दीड वर्षांमध्ये पन्नास टक्के शेतकऱ्यांचे वीज संकट दूर करेल.

इतकेच नव्हे तर, शेतकऱ्यांना स्वस्त दरात सरकारकडून वीज देण्यात येईल. ही वीज 24 तास उपलब्ध असेल. राज्यातील शेतकऱ्यांना फक्त 2 रुपये 87 पैसे ते 3 रुपये 10 पैशात वीज मिळेल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच यापूर्वी राज्य सरकारला साडेसात रुपयांचा खर्च येत होता. हा खर्च मोठ्या प्रमाणात वाचेल, राज्यातील विजेची बचत देखील होईल. हे सर्व प्रक्रिया केवळ 11 महिन्यामध्ये पूर्ण करण्यात आली आहे. अजून अठरा महिने काम करण्यासाठी दिले जाईल असे देखील फडणवीस यांनी सांगितले.