हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अजित पवार, ठाकरे गट आणि भाजप यांनी महायुती केल्यानंतर वेगवेगळे निर्णय घेण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील करण्यात आली. परंतु महायुतीत असलेले हे सरकार वेगवेगळ्या योजना आणण्याचे काम करत आहे. तसेच त्या योजनेची अंमलबजावणी देखील चालू झालेली आहे. अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत.
माहिती सरकार आणि योजनांबद्दल सांगताना अजित पवार म्हणाले की, “आम्ही महायुती झाल्यापासून आमच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली आहे. तसेच विकासासाठी आम्ही सरकारमध्ये गेलेलो आहोत. सत्ता असेल तर सर्वसामान्यांची कामे होतील. यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत आहोत. तसेच लाडक्या बहिणी सक्षम करण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रयत्न देखील करत आहोत. त्याचप्रमाणे आम्ही शेतकऱ्यांच्या अडचणी देखील गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मांडलेली आहेत.”
याच प्रमाणे अजित पवार यांनी सांगितले की, “त्यांनी कांदा निर्यात बंदी उठवण्याची विनंती केली, तर सोयाबीन आणि कापसाला देखील जास्त दर देण्याची विनंती केलेली आहे. तसेच त्यांनी साखर एमएसपी वाढवण्याची मागणी सरकारकडे केलेली आहे. त्याप्रमाणे येणाऱ्या निवडणुकीत महायुतीला जास्तीत जास्त जागा निवडून देण्याचे प्रयत्न करावेत. असे अजित पवार यांनी जनतेला सांगितले आहे.
रविवारी म्हणजेच 22 सप्टेंबर रोजी मोहोळ येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसामान्य यात्रा आली होती. यावेळी त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला. तसेच त्यांनी कार्यकर्त्यांना देखील मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले की, “वर्षभरामध्ये शेतकऱ्यांना दिवसा वीज दिली जाणार आहे. राज्यातील अनेक उपसा सिंचन योजना आहे. परंतु या योजना 20 बिलामुळे बंद पडतात. परंतु आता त्या योजनांसाठी आम्ही सोलर बसवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे आता शेतकऱ्यांचे सगळे वीज बिल झिरो असणार आहे.
यावेळी सुनील तटकरे यांनी देखील त्यांचे मनोगत व्यक्त केले. त्यावेळी ते म्हणाले की, “उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्याने संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण निघालेले आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा निवडून येतील. परंतु सत्ता असो किंवा नसो तसर्वसामान्य नागरिकांसाठी काम करणारे नेते म्हणजे राजन पाटील आहेत”