Farming Tips Of Capsicum | ‘या’ पिकाची लागवड करून शेतकऱ्यांना कमी खर्चात होईल बंपर कमाई, वाचा सविस्तर

Farming Tips Of Capsicum
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Farming Tips Of Capsicum | आपल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून दिलेले आहे. त्यामुळे आपले शेतकरी देखील पारंपारिक शेती न करता आता आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा मार्ग अवलंब होत आहेत. आज काल होणारा अवकाळी पाऊस, तसेच हवामानाचा फटका शेतीवर होतो. आणि शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास त्यांच्या हातातून निघून जातो. त्यामुळे आता शेतकरी सगळेच आधुनिक पद्धतीने शेती करतात. यामुळे पिकांचे नुकसान कमी होते आणि चांगलं नफा देतील होतो. आता तुम्हाला देखील असेच एक भरघोस पिकाचा नफा घ्यायचा असेल, तर आम्ही आता त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहोत. ज्यातून कमी खर्चात तुम्हाला खूप जास्त कमाई होऊ शकते.

कमी खर्चात होणार जास्त कमाई

तुम्हाला जर कमी खर्चात चांगली कमाई करायची असेल तर शिमला मिरचीची शेती (Farming Tips Of Capsicum ) करतो. ही शेती तुमच्यासाठी खूप फायद्याचे ठरेल. कमी खर्चात शिमला मिरचीची शेती करून अनेक शेतकऱ्यांनी चांगले उत्पन्न घेतलेले आहे. उत्तर प्रदेश तसेच महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांनी देखील हे पीक घेतलेले आहे. आणि शेतीचा एक नवीन प्रयोग केलेला आहे. उत्तर प्रदेशातील एका प्रगतशील शेतकऱ्याने यामध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांनी फक्त 2 हजार रुपयात 2 एकरात मिरचीचे पिक घेतले. आणि त्यापासून त्यांना जवळपास 70 ते 75 हजार रुपयांपर्यंतचा नफा मिळाला.

1 टन पिक घेतले | Farming Tips Of Capsicum

त्यांनी शिमला मिरचीची शेती (Farming Tips Of Capsicum )करण्यासाठी सुरुवातीला पारंपारिक पद्धतीने पॉलिहाऊस बनवले. त्यानंतर दिल्लीतील अशा प्रजातीच्या बिया मागून मग शिमला मिरचीसाठी त्यांनी नर्सरी तयार केली. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात त्यांनी शिमला मिरचीचे रोप आल्यानंतर त्याची पेरणी केली. यासाठी त्यांना केवळ 2 हजार रुपयांचा खर्च आला त्यांनी शिमला मिरचीचे पीक घेतले आहे.

ऑरगॅनिक पद्धतीने शेती

याबाबत रामलेश मोरया यांनी सांगितले आहे की, शिमला मिरचीची शेती त्यांनी ऑरगॅनिक पद्धतीने केली आहे. त्यांच्या भागात गोमूत्र वापरून त्यांनी ही शेती केलेली आहे. त्यामुळे तुम्ही देखील शेतीतून अधिक नफा मिळवायचा असेल, तर पारंपरिक पद्धतीची शेती सोडून आधुनिक शेतीला सुरुवात केली पाहिजे. तुम्ही देखील अशा प्रकारचा कोणताही नवीन प्रयोग करून सगळ्यांसमोर एक नवीन आदर्श निर्माण करू शकता.