आरटीओ कार्यालयाच्या मनमानी, भोंगळ कारभारा विरोधात आमरण उपोषण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | आरटीओ ऑफिसच्या मनमानी व भोंगळ कारभारा विरोधात आमरण उपोषण सुरू केले आहे. पाडळी (केसे) येथे असलेल्या कार्यालयास विश्व इंडियन पार्टी, भिम आर्मी संविधान रक्षक दल आणि भिमशक्ती सामाजिक संघटनेने 13 सप्टेंबर रोजी निवेदन दिले होते. त्यामध्ये 9 मुद्दे उपस्थित करून 15 दिवसात विचार करण्यास सांगितले होते. परंतु या निवेदनावर कोणतेही उत्तर न मिळाल्याने आरटीओ आॅफिसच्या दारात आमरण उपोषण सुरू केले आहे.

संघटनांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आरटीओ कार्यालय एजंट मुक्त करावे, जी फाॅर्मच्या नावाखाली अधिकारी एजंटाच्या माध्यमातून जनतेची लूट करीत आहेत, ती थांबवावी, कर्मचाऱ्यांनी नियमित ओळखपत्र गळ्यात घालावे, गेले 4 ते 5 वर्षे एआरटीओ पद रिक्त असून ते त्वरित भरावे. सुपने ते पाडळी रस्त्यावर लोकांना ऑफिसमध्ये रस्ता क्राॅस करतेवेळी ठोस उपयायोजना नसल्याने वारंवारं अपघात होत आहेत. पूर्वी झालेल्या बोगस पावती घोटळ्याचे काय झाले, हे सविस्तपणे जनतेसमोर उघड करावे. कार्यालयात अनेक कर्मचारी वेळेवर येत नाहीत, त्यामुळे थम मशीनद्वारे हजेरी घ्यावी. कार्यालयात पूर्णपणे अस्वच्छता असून दुरावस्था झाली आहे. त्यांची दुरूस्ती करावी.

तिन्ही संघटनांनी दिलेल्या निवेदनावर विश्व इंडियन पार्टीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लांडगे, भिमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे, भिम आर्मीचे जिल्हाध्यक्ष संतोष थोरवडे, सामाजिक कार्यकर्ते शांताराम थोरवडे यांच्या स्वाक्षरी आहेत. याबाबतचे निवेदन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना देण्यात आले आहे.  तसेच या उपोषणाची योग्य दखल न घेतल्यास होणाऱ्या पुढील अनुचित घटनेस आमची जबाबदारी राहणार नसल्याचे बापूसाहेब लांडगे यांनी सांगितले.