FASTag Update : टोल देण्यासाठी बराच वेळ रांगेत उभे रहावे लागू नये. तेथे प्रवाशांचा वेळ वाचावा शिवाय ट्रॅफिकची समस्या निर्मण होऊ नये याकरिता FASTag महत्वाची भूमिका बजावत आहे. जवळपास सर्वच वाहनांकडून FASTag च्या सुविधेचा वापर केला जातो आहे. मात्र भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या महत्वाच्या सूचनेनुसार २९ फेब्रुवारी पर्यंत जर वाहन चालकांनी प्राधिकरणाच्या नियमाची पूर्तता केली नाही तर त्यांचे FASTag निष्क्रिय केले जाण्याची (FASTag Update) शक्यता आहे. त्यामुळे NHAI ने कोणता नियम जारी केला आहे चला जाणून घेऊया…
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) फास्टॅगचे KYC अपडेट करण्याची अंतिम तारीख २९ फेब्रुवारी निश्चित केली आहे.या तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या फास्टॅगचे केवायसी पूर्ण न केल्यास, तुमचा फास्टॅग (FASTag Update) निष्क्रिय केला जाऊ शकतो. एवढेच नाही तर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांद्वारे काळ्या यादीत टाकला जाऊ शकतो. एनएचएआयने वन व्हेइकल वन फास्टॅग अंतर्गत हे पाऊल उचलले आहे. एका वाहनात एकापेक्षा जास्त फास्टॅग नसावेत हा त्याचा उद्देश आहे.
फास्टॅग केवायसी अपडेटची वाढवली मुदत (FASTag Update)
यापूर्वी फास्टॅगचे केवायसी करण्यासाठी ३१ जानेवारी ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र नंतर ती 29 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली. १ मार्चपासून तुम्ही फास्टॅगसाठी केवायसी न करता टोलवर गेलात, तर तुमच्या फास्टॅगमधून (FASTag Update) टोल कापला जाणार नाही. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या फास्टॅगचे केवायसी लवकरात लवकर अपडेट करा.
FASTag केवायसी कसे कराल अपडेट ? (FASTag Update)
- फास्टॅगचे केवायसी अपडेट करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला इंडियन हायवे मॅनेजमेंट कंपनी (IHML) च्या वेबसाइटवर जावे लागेल. तुम्ही थेट https://fastag.ihmcl.com/ या लिंकवर जाऊ शकता.
- आता तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाने फास्टॅगमध्ये लॉग इन करावे लागेल.
- यानंतर डॅशबोर्ड तुमच्या समोर उघडेल.
- येथे डावीकडे ‘माय प्रोफाइल’ विभाग दिला जाईल. येथे तुम्ही तुमच्या केवायसीची स्थिती तपासू शकता. याशिवाय नोंदणी करताना दिलेली सर्व माहिती येथे उपलब्ध असेल.
- केवायसी करण्यासाठी, तुम्हाला प्रोफाईल विभागाच्या पुढील केवायसी विभागात क्लिक करावे लागेल.
- यानंतर कस्टमर टाईप निवडा.
- आता तुम्हाला येथे आयडी प्रूफ सादर करावा लागेल.
- मग तुम्हाला डिक्लेरेशनवर चेक मार्क लावावा लागेल.
- त्यानंतर सर्व माहिती चेक करून ओके केल्यानंतर तुमची केवायसी (FASTag Update) अपडेटची प्रक्रिया पूर्ण होईल.