कराड तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचे 10 तारखेला उपोषण : अशोकराव पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | स्वस्त धान्य दुकानदारीत आता परवडत नाही. अनेक वर्ष काम करत आहोत. महाराष्ट्र संघटनेने ठोस निर्णय घ्यावा. दसरा- दिवाळी तोंडावर आलेली आहे. तेव्हा ग्राहकांना अडचण निर्माण होवू नये, यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. कराड तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना ज्या समस्या आहेत. त्याबाबत कोणीही लक्ष देत नाही, त्यामुळे त्यामुळे येत्या 10 ऑक्टोबरला तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अशोकराव पाटील यांनी दिली

कराड तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदाराची बैठक कराड येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी बैठकीस  जिल्हा संघटक संजय शेट्ये, कार्याध्यक्ष शिवाजी फाळके, सदस्य दादासो चव्हाण, सचिन इनामदार, कराड उत्तरचे अध्यक्ष संभाजी इंगवले, कराड दक्षिणचे अध्यक्ष सुरेश पाटील, कराड शहरचे किरण देसाई, उपाध्यक्ष रमेश मोहिते, प्रमोद नलवडे आदी उपस्थित होते.

अशोकराव पाटील म्हणाले, दिवसात दोन वेळा अंगठे घेऊन धान्य द्यायचे आहे, ही गोष्ट दुकानदारांना मान्य नसून त्या विरोधात संपूर्ण राज्य आहे. गेल्या दोन वर्षापासून धान्य दुकानदारांचे कमिशनचे पैसे मिळालेले नाहीत. केंद्राचे पैसे येवूनही किमान 10 ते 15 वेळा निवेदन देण्यात आलेले आहेत. धान्य घेताना तुट येणे. कराड तालुक्यातील 285 धान्य दुकानदार एकत्रित आले होते. यापुढे कोणताही प्रकारचा अन्याय सहन केला जाणार नाही. या अडीअडचणीच्या मुद्द्यांवरून ग्राहक दुकानदाराच्या अंगावर जात आहे. त्यामुळे दुकानदाराला मानसिक त्रास होत आहे. यापुढे काळात असा त्रास सहन केला जाणार नाही. तसेच जोपर्यंत आमच्यावरील अन्याय दूर होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.