SOVA Trojan : सावधान !!! जर आपल्या फोनमध्ये आला असेल ‘हा’ व्हायरस तर …

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SOVA Trojan : जर आपल्याला कोणत्याही अन-ट्रस्टेड सोर्सवरून ऍप डाउनलोड करण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा. कारण नुकतेच एसबीआयकडून एका ट्विट करत लोकांना SOVA ट्रोजन व्हायरसबद्दल सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या ट्विटमध्ये एसबीआयने म्हटले की,” हा एक असा व्हायरस आहे जो आपल्या फोनमध्ये प्रवेश करून आपल्या मौल्यवान असेट्सवर डल्ला मारू शकतो.”

बँकेकडून हा इशारा विशेषतः Android युझर्सना देण्यात आला आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार, हा व्हायरस गुप्तपणे आपला अँड्रॉईड फोन एन्क्रिप्ट करू शकतो. तसेच तो अनइन्स्टॉल करणे देखील अवघड आहे. SBI च्या मते, नेहमी ट्रस्टेड सोर्सवरूनच ऍप डाउनलोड करा. SOVA Trojan

SBI ਬੈਂਕ ਨੇ ਜਾਰੀ ਕੀਤਾ ਅਲਰਟ, ਇਸ ਗਲਤੀ ਨਾਲ ਖ਼ਾਲੀ ਹੋ ਸਕਦੈ ਤੁਹਾਡਾ ਬੈਂਕ ਖ਼ਾਤਾ - bank customers targeted by sova android trojan-mobile

सोवा व्हायरस विषयी जाणून घ्या

एसबीआयने दिलेल्या इशाऱ्यानुसार, हा एक ट्रोजन मालवेअर आहे जो बनावट बँकिंग ऍप्स वापरून लोकांचा पर्सनल डेटा चोरी करतो. याद्वारे आपली गुप्त आर्थिक माहिती चोरीला जाऊ शकते. जेव्हा युझर्सकडून नेट बँकिंग ऍप वापरले जाते तेव्हा हा मालवेअर त्यांचे क्रेडेंशियल्स रेकॉर्ड करतो. तसेच त्यातून बाहेरही पडत येत नाही. SOVA Trojan

Government Warned Against SOVA Android Trojan Targeting Banking Users | Banking Fraud Virus: बैंकिग फ्रॉड से बचना है तो ऑनलाइन फैल रहे इस विदेशी वायरस से सावधान रहें

हे कसे काम करते???

सर्वांत आधी आपल्या फोनमध्ये ते फेक एसएमएसद्वारे इंस्टॉल केले जाते. इन्स्टॉलेशननंतर हे ट्रोजन आपल्या फोनमध्ये असलेल्या ऍप्सची माहिती हॅकर्सना पाठवते. यानंतर हॅकर्स कमांड आणि कंट्रोलद्वारे आपल्या फोनवर व्हायरस पाठवतात. याबरोबरच एक लिस्ट देखील पाठविली जाते ज्यामध्ये टारगेट करण्यात येणाऱ्या ऍप्सची माहिती लिहिलेली असते. यानंतर जेव्हा आपल्याकडून असे ऍप्स वापरले जाते तेव्हा हा व्हायरस तो डेटा XML फाईलमध्ये सेव्ह करतो ज्याद्वारे हॅकर्स प्रवेश करू शकतात. SOVA Trojan

Mobile banking people beware! This virus is spreading rapidly,

यापासून सुटका कशी मिळवावी ???

एकदा हा व्हायरस फोनमध्ये शिरला की, तो काढून टाकणे खूप अवघड आहे. हे टाळण्याचा एकमेव उपाय म्हणजे सावधगिरी बाळगणे. यासाठी संशयास्पद असे कोणतेही ऍप डाउनलोड करू नका. तसेच, कोणतेही ऍप डाउनलोड करण्यासाठी फक्त ट्रस्टेड सोर्सच वापरा. ऍप डाउनलोड करण्यापूर्वी त्याचे रिव्यू वाचा. अ‍ॅपला परवानगी देण्यापूर्वी, आपण काय परवानगी देत ​​आहोत याची माहिती पूर्णपणे वाचा. SOVA Trojan

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.onlinesbi.sbi/

हे पण वाचा :

Stock Tips : घसरत्या बाजारातही ‘या’ 5 कंपन्यांचे शेअर्स देऊ शकतात मजबूत नफा, त्याविषयी तज्ज्ञांचे मत जाणून घ्या

Bank FD : ‘या’ बँकेने लाँच केली स्पेशल FD स्कीम !!! ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 8.40 % व्याज

DCB Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ, नवीन दर तपासा

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ, आजचे ताजे दर तपासा

‘या’ Multibagger Stock मध्ये पैसे गुंतववून गुंतवणूकदारांनी कमावला कोट्यावधींचा नफा !!!