धक्कदायक ! नगरसेविकेच्या पतीचा स्वतःच्याच मुलीवर बलात्कार

Kolhapur Rape Case
Kolhapur Rape Case
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर | नगरसेविकेच्या पतीने स्वतःच्याच मुलीवर बलात्कार केल्याची धक्कदायक बाब समोर आली आहे. नगरसेविकेचा पती गेल्या ३ वर्षांपासून स्वतःच्याच १० वर्षाच्या मुलीवर बलात्कार करत असल्याचे उघड झाले आहे. यामुळे कोल्हापूर आणि परिसरात एकच खळबळ उडाली असून आरोपी वडीलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथील नगरसेविकेचा आरोपी पती मोठा उद्याजक आहे. सुरुवातीला घरात कोणी नसताना आरोपी वडील आपल्या दहा वर्षांच्या मुलीवर जबरदस्ती करून बलात्कार करायचा. मात्र, काही काळानंतर त्याचे धाडस वाढले आणि त्याने पत्नीच्या समोरच मुलीसोबत अश्लील चाळे करायला सुरुवात केली. मात्र, या सर्व प्रकाराला कंटाळून नगरसेविकाने इचलकरंजी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना सर्व प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांनी वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.