टीम, HELLO महाराष्ट्र। जुन्नर तालुक्यातील हिवरे तर्फे नारायणगावात असलेल्या ठाकर समाजातील चार घराणं आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत चारही घरे जळून खाक झाली आहेत. या आगीत गंगूबाई दुधवडे, सयाजी मधे, सिंधूबाई मेंगाळ, बबन पथवे या चौघांची घरे उध्वस्थ झाली आहेत.
अवघ्यां २ दिवसांवर मुलीचे लग्न आल्याने सयाजी मधे यांनी सर्व साहित्य खरेदी करून घरात आणून ठेवले आणि नियतीने घाला घातला. या लागलेल्या आगीत लग्नाचे सर्व साहित्य जाळून खाक झाले आहे. त्यामुळे या कुटुंबावर दुहेरी संकट कोसळले आहे. मुलीच्या लग्नाचे सर्व साहित्यच जाळून गेल्याने आता काय करावे असा प्रश्न मध्ये कुटुंबासमोर उभा ठाकला आहे.
सदर घटनेची माहिती आमदार अतुल बेनके यांना फोनवर कळवली असता बेनके यांनी तत्काळ तहसीलदारांना कळवून तातडीने पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. तसेच मुलीच्या लग्नाला सर्वतोपरी वैयक्तिक मदत करणार असल्याचेही सांगितले आहे. दुःखाचा डोंगर कोसळलेल्या या कुटुंबियांचे ग्रामस्थांनी आधार देऊन सांत्वन केले आहे.
दरम्यान या घराणं लागलेल्या आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. परंतु पाचटाची घरे असल्याने आगीने लगेच उग्ररूप धारण केले होते. नागरिकांनी पाणी टाकत ही आग विझविण्याचा प्रयत्न केला प[परंतु त्यात त्यानं यश आले नाही.