हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या न्यायाधीश एम. फातिमा बीवी यांचे निधन झाले आहे. गुरुवारी वयाच्या 96 व्या त्यांनी केरळच्या खाजगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. फातिमा बीवी या भारताच्या उच्च न्यायव्यवस्थेत नियुक्त झालेल्या पहिल्या मुस्लिम महिला होत्या. त्यांचा जन्म 1927 साली केरळमध्ये झाला होता. या ठिकाणीच त्यांनी आपल्या शिक्षण आणि करिअरला सुरुवात केली.
एम. फातिमा बीवी यांनी न्यायाधीश होण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्यांनी आपल्या करियरची सुरुवात केरळमध्ये वकील म्हणून केली होती. पुढे त्या 1983 साली पहिल्या न्यायाधीश बनल्या. त्यांनी आपले शालेय शिक्षण पथानामथिट्टाच्या कॅथलिक शाळेत पुर्ण केले. त्यानंतर तिरुवनंतपुरम येथील कॉलेजमधून त्यांनी पुढील शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी गव्हरमेंट लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी मिळवली. कायद्याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर केरळमधील न्यायालयात त्या वकील म्हणून रुजू झाल्या.
1989 साली सर्वोच्च न्यायालयाच्या एम. फातिमा बीवी पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या. आपल्या कारकिर्दीत त्यांनी सत्याची बाजू कधीच सोडली नाही. फातिमा बीवी या 1993 साली न्यायाधीश पदावरून निवृत्त झाल्या. यानंतर त्यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात सदस्य म्हणून कामकाज पाहिले. राज्यपालपदाच्या काळात त्यांनी तामिळनाडू विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची देखील जबाबदारी सांभाळली. या कार्यकाळात फातिमा बीवी यांना भारत ज्योती पुरस्कार आणि यूएस- इंडिया बिझनेस कौन्सिल जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच 1990 मध्ये त्यांना डी.लिट पुरस्कार मिळाला होता.