हॅलो महाराष्ट्रऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना सुवर्णसंधी आहे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. या माध्यमांतून सहाय्यक श्रेणी 3 (AG-III), कनिष्ठ अभियंता (JE), स्टेनोग्राफर ग्रेड 2, आणि टंकलेखक ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 6 सप्टेंबर 2022 ला अर्ज सुरु होणार असून अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2022 आहे.
भरली जाणारी पदे –
1. सहाय्यक श्रेणी 3 (AG-III)
2. कनिष्ठ अभियंता (JE)
3. टंकलेखक आणि स्टेनोग्राफर ग्रेड 2 (स्टेनो ग्रेड)
मिळणारे वेतन-
JE – 34,000 ते 1,03,400 रुपये प्रति महिना
स्टेनो ग्रेड 2- 30,500 ते 88,100 प्रति महिना
एजी ग्रेड 3- 28,200 ते 79,200 प्रति महिना
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –
1. AG-III (तांत्रिक) उमेदवार कृषी/ वनस्पतिशास्त्र / जीवशास्त्र / बायोटेक / फूड इ. मध्ये पदवीधर असावा.
2. AG-III (सामान्य) – कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून पदवीधर पदवी. तसेच संगणकाचे ज्ञानही असायला हवे.
3. AG-III (खाते) – B.Com पदवी आणि संगणकाचे ज्ञान असावे.
4. AGIII (डेपो) – उमेदवार संगणकाचे ज्ञान असलेले पदवीधर असावेत.
5. JE (EME) – उमेदवाराकडे 1 वर्षाच्या अनुभवासह EE / ME अभियांत्रिकीमध्ये पदवी किंवा डिप्लोमा असावा.
6. ई (सिव्हिल) उमेदवाराकडे वर्षाच्या अनुभवासह सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदवी किंवा डिप्लोमा असावा.
7. हिंदी टायपिस्ट AG-II (हिंदी)- उमेदवार पदवीधर असावा आणि हिंदी टायपिंगमध्ये 30 शब्द प्रति मिनिट वेग असावा. तसेच अनुवादाचा एक वर्षाचा अनुभवही असावा.
8. स्टेनो ग्रेड-II DOEACC ‘O’ स्तर प्रमाणपत्रासह पदवीधर. यासोबत टायपिंग आणि स्टेनोचे कामही यायला हवे.
आवश्यक कागदपत्रे –
1. Resume
2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्र
3. शाळा सोडल्याचा दाखला
4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
6. पासपोर्ट साईझ फोटो
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://fci.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.