FD Interest Rate | आजकाल प्रत्येकजण आर्थिक दृष्ट्या सुरक्षित भविष्यासाठी आपल्या उत्पन्नाचा काही भाग हा गुंतवणूक करत असतो. जेणेकरून भविष्यात जर अचानक कोणतीही परिस्थिती आली तर त्यावेळी त्या व्यक्तीला सगळ्या गोष्टी करणे सोपे जाईल. अशातच गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु या गुंतवणुकीवर अनेक प्रकारच्या जोखीम देखील आहेत.
आतापर्यंत गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये एफडी (FD Interest Rate) हा सगळ्यात सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो. कारण त्यात कोणत्याही प्रकारची मार्केट रिस्क नाही. तसेच निश्चित व्याजदराने तुम्हाला परतावा देखील मिळतो. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पेशल योजना देखील आहेत. कारण जेष्ठ नागरिकांना एफडीवर सामान्य माणसांपेक्षा जास्त व्याजदर मिळतो. तर आपण आता असा अशा बँक जाणून घेणार आहोत ज्या ज्येष्ठ नागरिकांना चांगला परतावा देतात.
बँक ऑफ बडोदा | FD Interest Rate
बँक ऑफ बडोदा ही तीन वर्षाच्या एफडीवर 7.75 टक्के दराने व्याज देते. ही बँक जेष्ठ नागरिकांच्या एफडीवर सगळ्यात जास्त व्याज देते. जेष्ठ नागरिकांना 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर तीन वर्षात 1.26 लाख रुपये मिळतात.
ॲक्सिस बँक
ही बँक जेष्ठ नागरिकांना एफडीवर (FD Interest Rate) 7.60% दराने व्याज देते म्हणजे जर तीन वर्षासाठी जर तुम्ही 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर ती वाढून 1 लाख 25 हजार एवढी होते. म्हणजे ग्राहकांना 25000 रुपयांचा फायदा मिळतो.
पंजाब नॅशनल बँक
पंजाब नॅशनल बँक जेष्ठ नागरिकांच्या तीन वर्षाच्या एफडीवर 7.50% दराने व्याजदर देते. म्हणजे जर 1 लाखांची गुंतवणूक तुम्ही 3 वर्षासाठी केली तर तीन वर्षानंतर तुम्हाला 1 लाख 25 हजार रुपये मिळतील.
आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक
या दोन्ही बँका तीन वर्षाच्या कालावधीसाठी एफडीवर (FD Interest Rate) 7.50% दर देतात. जर ज्येष्ठ नागरिकांनी तीन वर्षासाठी 1 लाख रुपयांची एफडी केली, तर त्याला त्या कालावधीनंतर 1.25 लाख रुपयांचा परतावा मिळतो.