हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rate : RBI कडून नुकतेच रेपो दरात वाढ केली गेली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यामध्ये फायनान्स कंपन्यांचाही समावेश आहे. यादरम्यानच, आता PNB हाउसिंग फायनान्सने देखील आपल्या FD वरील व्याजदरात बदल केले आहेत.
PNB हाउसिंग फायनान्स लिमिटेड या नॅशनल हाऊसिंग बँक (NHB) सह रजिस्टर्ड असलेल्या कंपनीने 5 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या FD वरील व्याजदरांमध्ये बदल केला आहे. 7 ऑक्टोबर 2022 पासून हे नवीन दर लागू केले जातील. FD Rate
PNB हाउसिंग फायनान्सच्या एफडी वरील नवीन व्याजदर (FD Rate)
>> 12-23 महिन्यांच्या FD वर 7.00% व्याजदर ऑफर
>> 24-35 महिन्यांच्या FD वर, PNB हाउसिंग फायनान्स 6.80% व्याजदर देईल.
>> 36-47 महिन्यांच्या FD वर आता 7.55% व्याज मिळेल.
>> 48-120 महिन्यांच्या FD वर 7.40% व्याजदर मिळेल.
ज्येष्ठ नागरिकांसाठी जास्त व्याजदर (FD Rate)
इथे हे लक्षात घ्या कि, PNB हाउसिंग फायनान्स लिमिटेडकडून ज्येष्ठ नागरिकांना (60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या) 0.25% जास्त व्याजदर दिला जातो आहे. पीएनबी हाउसिंगच्या नियमांनुसार, यामधील गुंतवणुकीची रक्कम तीन महिन्यांच्या अनिवार्य लॉक-इन कालावधीनंतर काढता येते. मात्र, यासाठी खातेदारांना काही दंड द्यावा लागेल.
याबाबत PNB हाऊसिंग फायनान्सने वेबसाइटवर सांगितले की, “आता आपल्याला डिपॉझिट केल्याच्या तारखेपासून तीन महिन्यांनंतर मॅच्युरिटी आधीच पैसे काढण्याचा पर्यायही मिळेल. तसेच डिपॉझिट केल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत मुदतपूर्व पैसे काढणाऱ्या व्यक्तींना वार्षिक 4% दराने व्याज दिले जाईल. FD Rate
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :https://www.pnbhousing.com/fixed-deposit/interests-rates/
हे पण वाचा :
Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात साप्तहिकरीत्या वाढ, गेले आठवडाभर सराफा बाजाराची स्थिती कशी होती ते जाणून घ्या
FD Rates : खासगी क्षेत्रातील ‘या’ बँकेने फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात केली वाढ, असे असतील नवीन दर
Canara Bank ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 7.5% व्याज
Post Office च्या बचत योजनांवर आता मिळणार जास्त व्याज !!!
Business : घरबसल्या ‘या’ 5 मार्गांनी दरमहा करता येईल हजारोंची कमाई !!!