व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

शरद पवार हे राजकारणातील बर्म्युडा ट्रँगल, शिवसेना संपवायला तेच जबाबदार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यांनतर शिंदे गटातील नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेना संपवायला शरद पवारच जबाबदार आहेत. पवार हे राज्याच्या राजकारणातील बर्म्युडा ट्रँगल आहेत, त्यांच्याजवळ जे जे गेले ते संपले असं त्यांनी म्हंटल आहे.

2014 पासूनच शरद पवारांचा शिवसेना संपवण्याचा प्लॅन होता, त्यासाठी त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. कारण त्यांना शिवसेना-भाजप युती नको हवी होती. शरद पवारानी कधीही शिवसेनेशी जुळवून घेतले नाही. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्यात मैत्री असली तरी राजकीय मतभेद होतेच असेही शिवतारे म्हणाले.

दोन दिवसांपूर्वीच शरद पवार यांचं विधान होत की, निवडणूक आयोगाचा जो निर्णय असेल त्याचं स्वागत केलं पाहिजे, यावरून आपल्याला लक्षात यायला हवं की हे मोठे लोकं आहेत काहीही करु शकतात, असं शिवतारे म्हणाले आहेत. शरद पवार हे राज्याच्या राजकारणातील बर्म्युडा ट्रँगल आहेत. त्यांच्याजवळ गेलेले संपले, हवंतर त्यांचा राजकीय इतिहास तपासा असेही शिवतारेंनी म्हंटल.