हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rate : SBI कडून आपल्या ग्राहकांसाठी नुकतेच एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे. SBI ने आता FD वर जास्त व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. 14 जूनपासून हे नवीन व्याजदर लागू करण्यात आले आहेत. SBI कडून 2 कोटी रुपयांपेक्षा कमी आणि 211 दिवसांच्या कालावधीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
बँकेच्या 7 दिवस ते 210 या कालावधीत फिक्स्ड डिपॉझिट्सच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. SBI कडून आता 7 दिवसांपासून ते 45 दिवसांपर्यंतच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर वार्षिक 2.90 टक्के दराने व्याज मिळेल. आता ग्राहकांना 46 ते 179 दिवसांच्या FD वर 3.90 टक्के दराने व्याज मिळेल. मात्र इथे हे लक्षात घ्या कि, 180 दिवस ते 210 दिवसांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदर पूर्वीप्रमाणेच 4.40 टक्के राहणार आहे. FD Rate
एका मीडिया रिपोर्टनुसार, बँकेकडून 211 दिवसांपासून एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सचे व्याज दरात 20 बेसिस पॉइंट्सनी वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर हा दर 4.40 टक्क्यांवरून 4.60 टक्क्यांवर आला आहे. त्याचप्रमाणे बँकेने एक वर्ष ते दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वरील व्याज दर कमी केला आहे. यामुळे आता 5.30 टक्के व्याज दिले जाणार आहे. FD Rate
बँकेने दोन ते तीन वर्षाच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही 15 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. आता त्यासाठी 5.35 टक्के व्याज दिले जाईल. इथे हे लक्षात घ्या कि, बँकेने तीन ते पाच वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सच्या व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. आता त्यासाठी ग्राहकांना वार्षिक 5.45 टक्के दराने व्याज मिळत राहील. त्याचप्रमाणे, पाच ते दहा वर्षांच्या मुदतीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सच्या व्याजदरातही कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही आणि बँक त्यासाठी 5.50 टक्के दराने व्याज देत राहील. FD Rate
ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याज मिळेल
ज्येष्ठ नागरिकांना सात दिवस ते पाच वर्षांच्या कालावधीच्या FD वर 0.50 टक्के अतिरिक्त व्याज दिले जाईल. आता ज्येष्ठ नागरिकांना 211 दिवस ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर 5.10 टक्के व्याज मिळणार आहे. त्याचप्रमाणे, एक वर्षापासून दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 5.80 टक्के तर दोन वर्ष ते तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर वार्षिक 5.85 टक्के व्याजदर मिळेल. FD Rate
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/interest-rates/interest-rates/deposit-rates
हे पण वाचा :
Bank FD : ‘या’ बँकाकडून टॅक्स सेव्हिंग FD वर मिळत आहे सर्वाधिक व्याज !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये घसरण, आजचे नवीन दर पहा
Airtel च्या ‘या’ 2 प्रीपेड प्लॅन्स मध्ये ग्राहकांना मिळतील अनेक फायदे !!!
Jio च्या ‘या’ प्लॅन्समध्ये 3GB डेटासह मिळणार Disney Plus Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन !!!
Aadhar Card संबंधित सर्व सेवा आता घरपोच मिळणार !!!