हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rate : RBI कडून नुकतेच रेपो रेटमध्ये 40 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली आहे. यामुळे अनेक बँकाकडून आपल्या FD च्या दरात वाढ केली जात आहे. आता जना स्मॉल फायनान्स बँकेने देखील आपल्या FD च्या दरात वाढ केली आहे. बँकेने माउंटेड डिपॉझिट प्लस अकाउंट फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँक अशा डिपॉझिट्सना प्लस अकाउंट मानते ज्यातून मुदतपूर्व पैसे काढता येत नाहीत. त्याला FD प्लस असेही म्हंटले जाते.
या खात्याचे ऑटो रिन्युअल करता येत नाही. तसेच, या खात्यातून वेळे आधी रक्कम देखील काढता येत नाही. मात्र इथे हे लक्षात घ्या कि, जर खातेदाराचा मृत्यू झाला अथवा कोणतेही वैधानिक किंवा नियामक आदेश मिळाला तर या FD मधील डिपॉझिट्सची रक्कम मुदतीपूर्वी काढता येऊ शकेल…
जना स्मॉल फायनान्स बँक 7-14, 15-60, 61-90 आणि 91-180 दिवसांसाठी 2 कोटी रुपयांच्या FD वर 2.50 टक्के व्याज देत आहे. त्यानंतर 181-364 दिवसांसाठी 3.50 टक्के, 365 दिवसांसाठी 6.50 टक्के, 2 वर्षांपेक्षा कमी 1 वर्षासाठी 7.20 टक्के, 2-3 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी 6.85 टक्के, 3 वर्षे-5 मध्ये 6.85 टक्के,5 वर्षांसाठी 6.85 टक्के आणि 5 वर्षे-10 वर्षांच्या FD प्लसवर 6 टक्के व्याज देत आहे. FD Rate
जना स्मॉल फायनान्स बँक ही अशा स्मॉल फायनान्शियल बँकांपैकी एक आहे ज्या FD वर जास्त व्याज देत आहेत. बँकेने अलीकडेच सामान्य FD वर 3-5 वर्षात 7.80 टक्के व्याज देण्याची घोषणा केली होती. याशिवाय, बँक 36-60 महिन्यांच्या RD (रिकरिंग डिपॉझिट्स) वर 7.80 टक्के दराने व्याज देत आहे. FD Rate
या खाजगी क्षेत्रातील बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या FD वर 0.25 टक्क्यांवरून 1 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. बँक 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या FD वर 6 टक्के व्याज देत आहे. त्याच वेळी, तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीच्या FD वरील व्याज 3.50 टक्क्यांवरून 4.50 टक्के करण्यात आले आहे. FD Rate
FD च्या अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.janabank.com/images/PDF/Interest-Rates-for-Fixed-Deposits.pdf
हे पण वाचा :
Business Idea : केसांचा व्यवसाय सुरू करून दर महिन्याला मिळवा भरपूर पैसे
PM Kisan : आता घरबसल्या अशा प्रकारे पूर्ण करा e-KYC
Gold Price Today : सोन्यामध्ये वाढ तर चांदी मध्ये घसरण
IPL 2022 : प्लेऑफमध्ये नेहमीच धोकादायक ठरतो आर अश्विन, आकडेवारी काय सांगते पहा
आम्ही नक्कीच छत्रपती घराण्याचा सन्मान करू, मात्र… ; संभाजीराजेंनंतर संजय राऊतांचे मोठे विधान