FD Rates : ‘या’ बँकेने सुधारले FD वरील व्याजदर; ग्राहकांना होणार फायदा?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (FD Rates) ॲक्सिस बँक ही एक भारतीय बहुराष्ट्रीय बँकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी आहे. जिच्या मालमत्तेनुसार ही भारतातील खाजगी क्षेत्रात तिसरी सर्वात मोठी बँक म्हणून ओळखली जाते. तर बाजार भांडवलानुसार ही चौथी मोठी बँक आहे. नुकतेच या बँकेने एफडीवरील व्याजदर सुधारित केले आहेत. नव्या व्याजदरानुसार ॲक्सिस बँक आपल्या सामान्य ग्राहकांना ३% ते ७.२०% इतका व्याजदर प्रदान करणार आहे. त्याचवेळी ज्येष्ठ नागरिकांना ३.५०% ते ७.८५% इतका व्याजदर दिला जात आहे. शिवाय ही बँक ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंतची FD ऑफर करतेय. यासाठी Axis बँकेचे लागू केलेले हे नवे व्याजदर ७ जून २०२४ पासून लागू करण्यात आले आहेत. तुम्हीही ॲक्सिस बँकेचे FD धारक असाल तर नवे व्याजदर लगेच तपासा.

२ करोडपेक्षा कमी किंमतीच्या FD वरील सुधारित व्याजदर (FD Rates)

Axis बँक ७ दिवस ते १४ दिवस, १५ दिवस ते २९ दिवस कालावधीच्या FD वर सर्वसामान्य ग्राहकांना ३% आणि ज्येष्ठ नागरिकांना ३.५०% व्याजदर देत आहेत. तर ३० दिवस ते ४५ दिवस कालावधीसाठी सर्वसामान्य ग्राहकांना ३.५०% आणि ज्येष्ठ नागरिकांना ४ टक्के व्याजदर दिला जात आहे. शिवाय ४६ दिवस ते ६० दिवस कालावधीसाठी सामान्य ग्राहकांना ४.२५% आणि ज्येष्ठ नागरिकांना ४.७५% व्याजदर दिला जातोय. तसेच ६१ दिवस ते ३ महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी सामान्य ग्राहकांना ४.५०% आणि ज्येष्ठ नागरिकांना ५% व्याजदर दिला जातोय.

पुढे ३ महिने ते ४ महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी सामान्य ग्राहकांना ४.७५% आणि ज्येष्ठ नागरिकांना ५.२५% व्याजदर दिला जात आहे. (FD Rates) तर ४ महिने ते ५ महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी आणि ५ महिने ते ६ महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी सामान्य ग्राहकांना ४.७५% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ५.२५% व्याजदर प्रदान केला जात आहे. याशिवाय ६ महिने ते ७ महिन्यांपेक्षा कमी, ७ महिने ते ८ महिन्यांपेक्षा कमी आणि ८ महिने ते ९ महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर सामान्य ग्राहकांना ५.७५% आणि ज्येष्ठ नागरिकांना ६.२५% इतका व्याजदर दिला जात आहे.

यामध्ये ९ महिने ते १० महिन्यांपेक्षा कमी, १० महिने ते ११ महिन्यांपेक्षा कमी, ११ महिने ते ११ महिन्यांपेक्षा कमी २५ दिवस आणि ११ महिने २५ दिवस ते १ वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर ही बँक सामान्य ग्राहकांना ६% आणि ज्येष्ठ नागरिकांना ६.५०% व्याजदर देते आहे. (FD Rates) याशिवाय १ वर्ष ते १ वर्षापेक्षा कमी ४ दिवस, १ वर्ष ५ दिवस ते १ वर्षापेक्षा कमी ११ दिवस, १ वर्ष ११ दिवस ते १ वर्ष २४ दिवसांपेक्षा कमी, १ वर्ष २५ दिवस ते १३ महिन्यांपेक्षा कमी, १३ महिने ते १४ महिन्यांपेक्षा कमी आणि १४ महिने ते १५ महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर सर्वसामान्य ग्राहकांसाठी ६.७०% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.२०% व्याजदर दिला जातोय.

Axis बँकेकडून १५ महिने ते १६ महिन्यांपेक्षा कमी आणि १६ महिने ते १७ महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD साठी सर्वसामान्य ग्राहकांना ७.१०% आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.६०% व्याजदर प्रदान केला जात आहे. (FD Rates) तसेच १७ महिने ते १८ महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी सर्वसामान्य ग्राहकांना ७.२०% आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.८५% व्याजदर दिला जातोय. याशिवाय १८ महिने ते २ वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी सर्वसामान्य ग्राहकांना ७.१०% आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.७०% व्याजदर मिळतोय.

पुढे २ वर्षे ते ३० महिन्यांपेक्षा कमी, ३० महिने ते ३ वर्षांपेक्षा कमी, ३ वर्षे ते ५ वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर सर्वसामान्य ग्राहकांना ७.१०% आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.६०% इतका व्याजदर दिला जात आहे. (FD Rates) तर ५ वर्षे ते १० वर्षे कालावधीसाठी सर्वसामान्य नागरिकांना ७% आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.७५% इतका व्याजदर प्रदान केला जात आहे.