हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : गुंतवणुकीच्या प्रकारांमध्ये फिक्स्ड डिपॉझिट्स हा सर्वांत लोकप्रिय प्रकार मानला जातो. आजही गुंतवणुक करताना अनेक लोकांकडून फिक्स्ड डिपॉझिट्सलाच पहिली पसंती दिली जाते. गॅरेंटेड रिटर्न आणि पैसे गमावण्याचा धोका नसल्यामुळे मोठ्या संख्येने लोकांकडून एफडीची निवड केली जाते. मात्र हे लक्षात घ्या कि, बँकांमध्ये FD असलेल्या गुंतवणूकदारांसाठी 2022 हे वर्ष खूप चांगले ठरले आहे. कारण मे 2022 पासून बँकांकडून FD वरील व्याजदरात सातत्याने वाढ केली जाते आहे. आज आपण FD वर जास्त व्याज दर देणाऱ्या बँकांची माहिती जाणून घेउयात…

कॅनरा बँकेने 666 दिवसांच्या कालावधीचा स्पेशल FD प्लॅन तयार केला आहे. ज्यानुसार, बँकेकडून आपल्या सामान्य ग्राहकांना 7% दराने तर ज्येष्ठ नागरिकांना 7.5% दराने व्याज मिळेल. FD Rates

RBL बँक 15 महिन्यांच्या FD वर सामान्य ग्राहकांना 7% तर ज्येष्ठ नागरिकांना 7.50% दराने व्याज मिळेल. FD Rates
![]()
सरकारी बँक असलेल्या युनियन बँक ऑफ इंडियाने 17 ऑक्टोबरपासून 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या FD वरील व्याजदरात वाढ केली आहे. या दरवाढीनंतर, बँकेकडून 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वर 3% ते 7% पर्यंत व्याज मिळेल. FD Rates

IDFC फर्स्ट बँकेकडून 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंतच्या FD ची ऑफर दिली जाते. यावर ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अतिरिक्त व्याज मिळते. 750 दिवसांच्या FD वर सामान्य ग्राहकांना 7.25% तर ज्येष्ठ नागरिकांना 7.75% व्याज दर मिळेल. FD Rates
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.idfcfirstbank.com/personal-banking/deposits/fixed-deposit/fd-interest-rates
हे पण वाचा :
Interest Rates : ‘या’ चार बँका बचत खात्यावर देत आहेत सर्वाधिक व्याज, नवीन दर तपासा
PNB ने FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीन व्याज दर तपासा
नवीन बदल अन् फीचर्स सहित पुन्हा लाँच होणार Yamaha RX 100, कंपनीने दिले सूतोवाच
‘या’ Multibagger Stock ने गेल्या 4 वर्षांत गुंतवणूकदारांना दिला कोट्यवधी रुपयांचा नफा !!!
Train Cancelled : दिवाळीनंतरही रेल्वेकडून 116 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा




