हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : RBI कडून रेपो दरात वाढ करण्यात आल्यानंतर अनेक बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे कर्जावरील व्याजदरात वाढ होत असतानाच बँकेच्या डिपॉझिट्सवरील व्याजदरही वाढू लागले आहेत. याच दरम्यान आता Axis Bank ने देखील 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरील माहिती नुसार, 9 सप्टेंबर 2022 पासून हे नवीन व्याजदर लागू करण्यात आले आहेत. आता बँकेकडून 7 दिवस ते 6 महिन्यांच्या FD वरील व्याजदरात 25 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. FD Rates
हे लक्षात घ्या कि, Axis Bank ने ऑगस्टमध्ये 17 महिने आणि 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वरील व्याजदरातही वाढ केली होती, मात्र यावेळी उर्वरित कालावधीच्या FD वरील व्याजदरात कोणताही बदल केलेला नव्हता. आता Axis Bank कडून 7 दिवस ते 29 दिवसांच्या FD वर 2.75% व्याज दर दिला जाईल. आता बँकेच्या ग्राहकांना 30 दिवस ते 3 महिन्यांच्या FD वर 3.25% व्याज मिळेल. त्याचप्रमाणे, 3 महिने ते 6 महिन्यांच्या FD वर 3.75%, 6 ते 7 महिन्यांच्या FD वर 4.40%, 7 ते 8 महिन्यांच्या FD वर 4.65%, 9 महिन्यांच्या FD वर 4.65% आणि 9 महिन्यांपेक्षा जास्त आणि 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर 4.75% व्याजदर मिळत राहतील. FD Rates
अशा प्रकारे मिळेल व्याज
आता Axis Bank च्या 1 वर्ष ते 1 वर्ष 11 दिवसांच्या FD वर 5.45%, 1 वर्ष 11 दिवस ते 1 वर्ष 25 दिवसांच्या FD वर 5.75% ,1 वर्ष 25 दिवस ते 2 वर्षांच्या FD वर 5.60%, 2 ते 5 वर्षाच्या FD वर 5.70%, 5 ते 10 वर्षांच्या FD वर ग्राहकांना 5.75 टक्के दराने व्याज मिळेल. FD Rates
ज्येष्ठ नागरिकांना मिळणार जास्त व्याज
Axis Bank कडून आता ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 29 दिवसांच्या FD वर 2.75%, 30 दिवस ते 3 महिन्यांच्या FD वर 3.25%, 3 ते 6 महिन्यांच्या FD वर 3.75%, 1 वर्ष ते 1 वर्ष 11 दिवसाच्या FD वर 6.20% आणि 1 वर्ष 11 दिवस ते 1 वर्ष 25 दिवसाच्या FD वर 6.50 टक्के व्याज मिळत आहे. FD Rates
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.axisbank.com/interest-rate-on-deposits
हे पण वाचा :
अमेरिकेतून नवीन iPhone 14 खरेदी करण्याचे फायदे अन् तोटे जाणून घ्या
Investment : ELSS की PPF यापैकी कोणती योजना जास्त फायदेशीर आहे ??? तज्ञांकडून जाणून घ्या
ICICI Bank ने गुंतवणूकदारांना केले मालामाल !!! 23 वर्षात दिला 220 पट रिटर्न
आता रोजंदारीवरील मजुरांनाही मिळणार 3,000 रुपयांची पेन्शन !!! EPFO च्या या योजने बाबत जाणून घ्या
Sovereign Gold Bond वर किती टॅक्स द्यावा लागतो तज्ञांकडून समजून घ्या !!!