हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या 9 महिन्यांत RBI ने रेपो दरात वारंवार वाढ केली आहे. ज्यानंतर अनेक सरकारी आणि खाजगी बँकांकडून एफडीवरील व्याजदरात वाढ केली गेली आहे. यामध्ये आता देशातील 102 वर्षे जुन्या Tamilnad Mercantile Bank ने 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे. FD Rates
10 फेब्रुवारी 2023 पासून नवीन दर लागू
बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, 10 फेब्रुवारी 2023 पासून हे नवीन दर लागू होणार आहेत. बुधवारी RBI ने रेपो दरात 25 बेसिस पॉइंट्स (0.25 टक्के) वाढ करून 6.50 टक्क्यांवर नेल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे बँकेने सांगितले आहे. आता Tamilnad Mercantile Bank कडून ग्राहकांना जास्तीत जास्त 8 टक्के आणि FD वर ज्येष्ठ नागरिकांना 8.50 टक्के व्याज देत आहे. हे जाणून घ्या कि, 1921 मध्ये स्थापन झालेल्या या बँकेच्या संपूर्ण देशभरात मिळून 509 शाखा आणि 12 प्रादेशिक कार्यालये आहेत. FD Rates
Tamilnad Mercantile Bank च्या एफडीचे नवीन दर (FD Rates)
कालावधी सर्वसामान्य नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी
7 दिवस ते 14 दिवस 5.25 टक्के 5.25 टक्के
15 दिवस ते 29 दिवस 5.25 टक्के 5.25 टक्के
30 दिवस ते 45 दिवस 5.25 टक्के 5.25 टक्के
46 दिवस ते 60 दिवस 5.25 टक्के 5.25 टक्के
61 दिवस ते 90 दिवस 5.25 टक्के 5.25 टक्के
91 दिवस ते 120 दिवस 5.25 टक्के 5.25 टक्के
121 दिवस ते 179 दिवस 6.00 टक्के 6 टक्के
180 दिवस ते 270 दिवस 6.00 टक्के 6.00 टक्के
270 दिवस ते 365 दिवस 6.00 टक्के 6.00 टक्के
399 दिवस 8 टक्के 8.50 टक्के
1 वर्ष 7.25 टक्के 7.75 टक्के
1 वर्षापेक्षा जास्त 20 महिने 20 दिवस 7.00 टक्के 7.50 टक्के
20 महिन्यांपेक्षा जास्त मात्र 2 वर्षांपेक्षा कमी 7.00 टक्के 7.50 टक्के
2 वर्षांपेक्षा जास्त मात्र 3 वर्षांपेक्षा कमी 6.75 टक्के 7.50 टक्के
3 वर्षे ते 10 वर्षे 6.50 टक्के 7.00 टक्के
रेपो दरात सलग सहाव्यांदा वाढ
8 फेब्रुवारी रोजी RBI ने सलग सहाव्यांदा रेपो दरात वाढ केली. RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पतधोरण बैठकीनंतर बोलताना सांगितले की,” जगातील वाढत्या महागाईचा दबाव भारतावरही आहे आणि त्यावर पूर्णपणे मात करण्यासाठी पुन्हा एकदा कर्जाच्या व्याजदरात वाढ करणे आवश्यक झाले आहे. मात्र, यावेळी रेपो दरात केवळ 0.25 टक्के वाढ करण्यात आली आहे.” FD Rates
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.tmb.in/deposit-interest-rates.aspx
हे पण वाचा :
Tax Saving Tips : आपल्या गुंतवणुकीचे अशा प्रकारे नियोजन करून वाचवा टॅक्स
Adani Group ला आणखी एक झटका !!! सिटी बँकेनंतर आता ‘या’ बँकेने देखील कर्ज देण्यास नकार
Pre-Approved Loan म्हणजे काय ??? जाणून घ्या ते घेण्याचे फायदे
Earn Money : मोबाईलवरून फोटो काढून कमवता येतील पैसे, जाणून घ्या त्यासाठीची पद्धत
Activa Electric Scooter : आपल्या पेट्रोल अॅक्टिव्हाला अशा प्रकारे बदला इलेक्ट्रिकमध्ये, त्यासाठी किती खर्च येईल ते पहा