FD Rates : खाजगी क्षेत्रातील ‘या’ बँका FD वर देत आहेत जास्त व्याज, जाणून घ्या व्याज दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates :RBI कडून नुकतेच रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता खाजगी क्षेत्रातील ICICI Bank आणि Kotak Mahindra Bank ने देखील आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे.

ICICI Bank Q2 Net Profit seen up 31.5% YoY to Rs. 7,245.9 cr: Prabhudas Lilladher

18 ऑक्टोबर 2022 पासून नवीन दर लागू

मात्र, ICICI Bank चे नवीन व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर लागू होतील. 18 ऑक्टोबर 2022 पासून हे नवीन व्याजदर लागू झाले आहेत. बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. आता ICICI बँकेच्या FD वर 3.00% ते 6.10% पर्यंत व्याज दिले जाईल. तसेच ICICI बँकेतील 3 वर्षे, 1 दिवस ते 5 वर्षांपर्यंतच्या मुदतीच्या कालावधीसाठीच्या FD वर 6.20 टक्के हा सर्वाधिक व्याजदर असेल. याशिवाय, बँकेने 30 सप्टेंबर रोजी ‘गोल्डन इयर्स एफडी’ योजना देखील सुरू केली आहे.

Missed you credit or debit card delivery? ICICI Bank launches unique OTP-based self-service delivery facility. Here are the details - The Statesman

ICICI Bank नवीन व्याज दर  (FD Rates)

7 ते 29 दिवस – 3.50%
30 ते 60 दिवस – 3.50%
60 ते 90 दिवस 3.75%
91 ते 184 दिवस – 4.25%
185 दिवस ते 1 वर्ष 5%
1 वर्ष ते 2 वर्षे – 5.80%
2 वर्षे ते 3 वर्षे – 6%
3 वर्षे ते 5 वर्षे – 6.20%
5 वर्षे ते 10 वर्षे – 6.10%

Bank Stocks to Track – III: Kotak Mahindra Bank

कोटक महिंद्रा बँक FD वरील व्याज दर (FD Rates)

7 दिवस ते 14 दिवस 2.50%,
15 ते 30 दिवस 2.75 %
31 दिवस ते 90 दिवस 3.25%
91 दिवस ते 179 दिवस 3.75%
121 दिवस ते 179 दिवस 4%
23 महिने 6.2%
3 वर्षे ते 10 वर्ष 6.10%

Fixed Deposit Interest Rate, Fixed Deposit Calculator, FD Calculator, FD Interest Rate, FD Interest Rate 2021 | Personal News – India TV

अनेक बँकांनी FD चे दर वाढवले ​​आहेत

अलीकडेच CSB बँक लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, RBL बँक, Axis बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये (FD Rates) वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Fear of lending, few borrowers — why banks are flooding RBI with funds for low returns

रेपो रेट गेल्या 3 वर्षांच्या उच्चांकावर

अलीकडेच, RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर नेला. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. FD Rates

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.southindianbank.com/interestrate/interestratelist.aspx

हे पण वाचा :
Multibagger Stock : गेल्या काही वर्षांत 200% जास्त रिटर्न देऊन ‘या’ शेअर्सने गुंतवणूदारांना केले मालामाल !!!
Canara Bank ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 7.5% व्याज
Bank FD : ‘या’ 102 वर्ष जुन्या बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याज दर तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, नवीन दर पहा
Whatsapp Banking : घरबसल्या आपल्या बँकेशी संबंधित सर्व माहिती मिळवण्यासाठी ‘Save’ करा ‘हे’ नंबर