हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : RBI कडून रेपो दरात अनेकदा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्व बँकांकडूनही व्याजदर वाढवण्यात आले आहेत. यावेळी बँका कर्ज आणि एफडीवरील व्याजदरात वाढ करत आहेत. ज्यामुळे एकीकडे बँकांकडून कर्ज घेणे महागले असून दुसरीकडे FD वर जास्तीत जास्त व्याज देण्यासाठी बँकांमध्ये स्पर्धा सुरू आहे. अशा परिस्थितीत, जर आपल्यालाही गुंतवणूक करायची असेल तर तर FD मध्ये गुंतवणूक करणे खूप फायद्याचे ठरू शकेल.
तर कोणत्या बँकेमध्ये FD काढणे चांगले ठरेल ??? जर आपल्याही मनात असा विचार आला असेल तर आजची ही बातमी आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकेल. कारण आज आपण खाजगी क्षेत्रातील 3 प्रमुख बँकांच्या एफडीवरील व्याजदरांबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. हे लक्षात घ्या कि, अलीकडच्या काळात या बँकांनी देखील एफडीवरील व्याजदर वाढवले आहेत. या बँकांचे व्याजदर खाली देण्यात आले आहेत.
Axis Bank FD Rates
या बँकेकडून ग्राहकांना 10 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी अनेक एफडी स्कीम देण्यात येत आहेत. तसेच ही बँक 2 वर्षांपेक्षा जास्त आणि 30 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी FD वर जास्तीत जास्त व्याज दर देत आहे. ही बँक सर्वसामान्य नागरिकांना 7.26 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.01 टक्के दराने व्याज देत आहे.
HDFC Bank FD Rates
खाजगी क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या HDFC बँकेडून 15 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी FD योजना उपलब्ध आहेत. ही बँकेकडून 15 महिने ते 18 महिन्यांच्या कालावधीसाठी FD वर जास्तीत जास्त व्याज दर देत आहे. ही बँक सर्वसामान्य नागरिकांना 7.10 टक्के आहे, तर ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के दराने व्याज देत आहे. 21 फेब्रुवारी 2023 पासून या बँकेचे हे नवीन एफडी दर लागू झाले आहेत.
ICICI Bank FD Rates
खाजगी क्षेत्रातील या आणखी एका मोठ्या बँकेकडे 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी अनेक FD योजना उपलब्ध आहेत. ही बँक 18 महिने ते 2 वर्षांच्या कालावधीसाठी FD वर जास्तीत जास्त व्याज देत आहे. तसेच ही बँक सर्वसामान्य नागरिकांना 7.10 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के दराने व्याज देत आहे. 24 फेब्रुवारी 2023 पासून बँकेचे हे नवीन एफडी दर लागू झाले आहेत.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.icicibank.com/personal-banking/deposits/fixed-deposit/fd-interest-rates
हे पण वाचा :
Edible Oil : खाद्यतेलाच्या किंमतींतील घसरण सुरूच, जाणून घ्या भाव
‘या’ Multibagger Stock ने अवघ्या 1 महिन्यात शेअरधारकांचे पैसे केले दुप्पट !!!
OnePlus चा ‘हा’ नवीन स्मार्टफोन बाजारात घालणार धुमाकूळ, तपासा किंमत अन् फीचर्स
Airtel ची छोट्या कुटुंबांसाठी खास ऑफर !!! आता एकाच प्लॅनअंतर्गत 4 जणांना मिळेल कनेक्शन
Gold Price Today : उच्च पातळीवरील नफावसुलीमुळे सोन्या-चांदीच्या किंमतीत बदल, पहा आजचे दर