हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : काही दिवसांपूर्वीच RBI कडून रेपो दरात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांच्या कर्जाचे व्याजदर वाढण्यास सुरुवात झाली. मात्र एकीकडे कर्जावरील व्याजदरात वाढ होत असतानाच बँकांनी FD वरील व्याजदरातही वाढ केली आहेत. दरम्यान, इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने देखील आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्स वरील व्याजदरात वाढ केली आहे.
इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने देखील 2 कोटी रुपयांपेक्षा कमी डिपॉझिट्सच्या FD चे दर वाढवले आहेत. हे नवीन दर 27 जून पासून लागू करण्यात आले आहेत. हे लक्षात घ्या कि, बँकेने एक वर्ष ते 3 वर्षांपर्यंतच्या कालावधीच्या व्याजदरात वाढ केली आहे. FD Rates
इक्विटास बँकेने 7 ते 45 दिवसांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर ग्राहकांना 3.50 टक्के दराने व्याज दिले आहे. तसेच 46 दिवस ते 62 दिवसांच्या एफडीवर 4 टक्के आणि 63 दिवस ते 90 दिवसांच्या एफडीवर 4.25 टक्के दराने व्याज दिले जाईल. त्याच वेळी, 91 दिवस ते 180 दिवसांच्या FD वर 4.75 टक्के दराने व्याज मिळेल. 1याचप्रमाणे 81 दिवस ते 364 दिवसांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर 5.25 टक्के दराने व्याज मिळेल. FD Rates
हे लक्षात घ्या कि, 8 जून 2022 रोजी, RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो दरात 50 बेस पॉईंट्सची वाढ जाहीर केली. यावेळी तो 4.40 टक्क्यांवरून 4.90 टक्के केला गेला आहे. या आधी देखील 4 मे 2022 रोजी RBI ने रेपो दर 40 बेसिस पॉईंट्सने वाढवून 4.00 टक्क्यांवरून 4.40% केला होता. FD Rates
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://equitasbank.com/fixed-deposit
हे पण वाचा :
PAN-Aadhaar Link करण्यासाठी उरले फक्त 3 दिवस !!! त्यासाठीची प्रक्रिया पहा
आता Post Office च्या लहान बचत योजनांवरील व्याजदर देखील वाढणार !!!
Eoin Morgan : इंग्लंडला विश्वचषक मिळवून देणारा कर्णधार लवकरच घेणार निवृत्ती !!!
Bank Holidays : जुलैमध्ये तब्ब्ल 14 दिवस बँका राहणार बंद, सुट्ट्यांची लिस्ट तपासा
‘या’ Multibagger Stocks ने एका वर्षात गुंतवणूकदारांना मिळवून इतके पैसे !!!