FD Schemes | आपण आपल्या भविष्याचा विचार करून आपण नेहमीच काही ना काही सेविंग करत असतो. आपण अनेक वेगवेगळ्या योजनांमध्ये हे पैसे गुंतवत असतो. परंतु अजूनही फिक्स डिपॉझिट म्हणजेच एफडी अनेक लोक करत असतात. परंतु आजकाल फिक्स डिपॉझिटवर मिळणारे व्याज हे कमी कमी होत चाललेले आहे. त्यामुळे अनेक जण एफडी करायला देखील नको म्हणतात.
परंतु अजूनही अशा अनेक बँका आहेत जेष्ठ नागरिकांना त्यांच्या एफडीवर सर्वात जास्त व्याज देतात. या बँकात दोन कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीसाठी जास्त व्याजदर देत आहे. तर आता आपण पाहूयात की, या कोणत्या बँका आहेत ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या एफडीवर खूप जास्त व्याजदर देतात.
डीसीबी बँक
ही बँक ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या एफडीवर 8.35% दराने व्याज देत आहे. हा व्याजदर 25 महिने 37 महिन्यांच्या कालावधी असलेल्या एफडीसाठी आहे. 37 महिन्यांच्या कालावधीसाठी साठी ही बँक 8.5 टक्के व्याज दराने देत आहे.
इंडसइंड बँक | FD Schemes
ही खाजगी क्षेत्रातील बँक आहे. ही बँक 33 महिने ते 39 महिन्यांच्या मुदतीच्या एफडीवर तब्बल 8 टक्के दराने व्याज देत असते. ही बँक 19 महिने आणि 24 महिन्यांच्या परिपक्व होणाऱ्या एफडीवर 8.25 टक्के दराने व्याज देते. हे व्याजदर देखील नागरिकांना खूप परवडणारे असते. त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक या बँकेमध्ये एफडी करतात.
येस बँक
येस बँक देखील एक खाजगी बँक आहे. ही बँक जेष्ठ नागरिकांना त्यांच्या फिक्स डिपॉझिटवर 8 टक्के दराने व्याज देत असते. हा व्याजदर 36 महिने ते 60 महिन्यांच्या एफडीवर असते. परंतु जर 18 महिने ते 24 महिन्यांच्या एफडी असेल, तर ही बँक 8.25 टक्के दराने व्याज देते. त्यामुळे जेष्ठ नागरिकांसाठी हा देखील खूप चांगला पर्याय आहे.
बंधन बँक
या बंधन बँकेत जर तुम्ही 3 वर्षाची एफडी केली. तर या 3 वर्षाच्या एफडीवर तुम्हाला तब्बल 7.75 टक्के दराने व्याज मिळते. परंतु जर तुम्ही 500 दिवसांची एफडी केली तर या एफटीवर जेष्ठ नागरिकांना 8.35% दराने व्याज मिळते.
IDFC FIRST Bank
ज्येष्ठ नागरिकांनी जर 751 दिवसांची ते 1095 दिवसांची एफडी केली, तर ही बँक तब्बल 7.75 टक्के एवढे व्याज देते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना जर एफडी करायची असेल तर ही बँक देखील चांगली आहे
ज्येष्ठ नागरिक जेव्हा एफडी तयार करतात, तेव्हा त्यांनाही गोष्ट लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे की, जर तुमच्या व्याजावर तुम्हाला 50,000 रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळत असेल, तर त्यातून बँकेद्वारे टीडीएस देखील कापला जाऊ शकतो. बँकेचा हा टीडीएस दर 10 टक्के निश्चित केलेला असतो. पण जर तुम्ही पॅन कार्ड सादर केले नाही तर हा टीडीएस दर 20% पर्यंत जातो.