औरंगाबाद | औरंगाबाद मध्ये हजारो लोक मास्कविना फिरत आहेत. खाजगी रुग्णालयात अनेक जण ताप आल्याने दाखल होत आहेत. त्यामुळे कोरोनाची मोठी लाट येण्याचा इशारा केंद्रीय आरोग्य पथकाने बुधवारी दिला. ही लाट रोखण्यासाठी कंटेनमेंट झोन तपासणी वाढवा अशी सूचनाही पथकाने केली आहे.
केंद्रीय अत्यावश्यक आरोग्य सेवा संचालक डॉ.रवींद्रन यांच्या नेतृत्वात पथकाने घाटीत आढावा घेतला. एन-२, एन-४ येथील आरोग्य केंद्राला भेट दिली. विविध वसाहतींची पाहणी केली त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी सार्वजनिक आरोग्यतज्ञ डॉ. सुनील खापर्डे, डॉ.संकेत कुलकर्णी राज्य सर्वेक्षण, राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मास्कविना फिरणाऱ्यांवर कारवाई करा असे डॉक्टर रविंद्रन यांनी सांगितले. तसेच फैलाव रोखण्यासाठी सामाजिक रुग्णालय, शासकीय स्तरावर कडक उपाय करा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, तपासणी, कंटेनमेंटझोन वाढवा.रुग्ण तात्काळ शोधण्यासाठी डॉक्टर, आशा वर्कर,निरीक्षकांना प्रशिक्षण द्या अशी सूचना केली.
——————–
या आहेत सूचना
१.पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरातील निगेटिव्ह सदस्यांनाही पाच दिवस त्यांना क्वारंनटाइन तपासणी उपचारानंतर त्यांना घरी जाऊ द्या.
२. खासगी रुग्णालयात तापेवर उपचार करून घेणाऱ्यांची तपासणी करा.
३.औद्योगिक परिसर, गर्दीचे ठिकाणे, कंटेनमेंट झोनमध्येही तपासणी वाढावा.
४. एकाच कुटुंबात बाधितांचे प्रमाण वाढल्याने पुरेशी सुविधा नसल्यास होम क्वारंनटाइनऐवजी कोविड सेंटरवर पाठवा.
५.उपचार सुविधा, व्हेंटिलेटर,ऑक्सिजन व्यवस्था करा.
६. लसीकरणाला गती द्या. ट्रेसिंग, ट्रेकिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट ही सुत्री वापरा.
७. कंटेनमेंट झोनची मोठे,लहान विभागणी करा.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा