स्त्रीशक्ती : कडाकणी करताना टोमणे मारल्याने पतीची लाटण्याने धुलाई

0
82
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर | नवरात्रौत्सव हा स्त्रीशक्तीचा महिमा सांगणारा सण म्हणून ओळखला जातो. नवरात्र सणात देवाला नैवेद्य कडाकणी केली जातात. नैवेद्याला कडाकणी करताना पतीने पत्नीला सोफासेटवरील साहित्य उचलण्याच्या तक्रार करत टोमणे मारल्याने चक्क पोळपट, लाटण्याचा प्रसाद खावा लागला आहे. याबाबतची नोंद पोलिस स्टेशनमध्येही झालेली आहे.

पतीची लाटण्याने धुलाई झाल्‍याचे हे प्रकरण थेट पोलिस स्‍टेशन ठाण्यात पोहचले आहे. पतीची लाटण्याने धुलाई झाल्‍याची जोरदार चर्चा सर्वत्र सुरू आहे. दिवसभराचे काम आटोपून पत्नी रात्री कडाकण्या करत होती. याचवेळी पतीकडून पत्‍नीकडे सोफासेटवरील सर्व साहित्य हटविण्याची मागणी सुरू होती. आधीच दिवसभरात घरातले काम आटोपून पत्‍नी कडाकणी करण्यासाठी धडपडत असताना पतीकडून इकडे साहित्‍य पडले आहे. तिकडे साहित्‍य पडल्‍याची तक्रार सुरू होती.

कामामुळे इतरत्र पडलेल्या पसार्‍यावरून पतीकडून टोमणे ऐकून पत्नीचा पारा चांगलाच चढला. तिने मी काय करतेय दिसत नाही का? अशी विचारणा करत तिने पोळपाट, लाटण्याचा प्रसाद पतीला दिला. यामध्ये पती किरकोळ जखमी झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here