हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Fenugreek Seeds Side Effects) आपल्याला उत्तम आरोग्य हवे असेल तर नुसता आहार फायद्याचा नाही. उत्तम आणि सकस आहार घेणे महत्वाचे असते. त्यात आपल्या आरोग्यासाठी काय चांगले आणि काय वाईट याविषयी आपल्याला माहिती असायला हवी. अन्यथा एखाद्या पदार्थाच्या सेवनानारे आपल्या आरोग्याची हानी होण्यास काही मिनिटे पुरेशी ठरतात. अशाच एका पदार्थांविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. हा पदार्थ म्हणजे मेथी दाणा. जो मधुमेहींसाठी वरदान असला तरी काही लोकांसाठी श्राप ठरू शकतो.
आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे मेथी दाण्याचे सेवन केल्याने मधुमेहींचा आजार कंट्रोलमध्ये राहतो. यासाठी दररोज मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी उपाशी पोटी खाण्याचा आणि मेथी दाण्याचे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. असे असले तरीही काही रुग्णांच्या आरोग्यासाठी मात्र मेथी दाणा प्रचंड घातक ठरतो. (Fenugreek Seeds Side Effects) मेथी दाणा कुणी खाऊ नये? आणि तो खाल्ल्याने काय दुष्परिणाम होतात याविषयी जाणून घेऊया.
अस्थमाचे रुग्ण
ज्यांना अस्थमाचा त्रास असेल अशा रुग्णांनी मेथी दाणा किंवा त्याच्या पाण्याचे सेवन करू नये. कुणीही सल्ला दिला तर तो अमलात आणण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला द्यावा. कारण, अशा रुग्णांनी मेथी दाण्याचे सेवन केल्यास श्वसन संबंधित गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
हायपोग्लाइसेमियाचे रुग्ण
जर तुम्हाला मधुमेह असेल आणि तो कंट्रोल करण्यासाठी तुम्ही मेथी खात असाल तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. (Fenugreek Seeds Side Effects) कारण मेथीच्या दाण्यांचे किंवा पाण्याचे सेवन केल्याने ब्लड शुगर वाढण्याची शक्यता असते. अशी परिस्थिती हायपोग्लाइसेमिया असणाऱ्या रुग्णांसाठी घातक ठरू शकते.
पोटाच्या आजाराने त्रस्त रुग्ण
जर तुम्हाला पोटाशी संबंधित कोणताही आजार असेल तर मेथी दाण्याचे सेवन करू नका. कारण मेथीचे सेवन केल्यामुळे काही लोकांना बॅक्टेरियाची समस्या जाणवू शकते. तर काहींना गॅस होणे, पोटदुखी, उल्टी आणि मळमळसारख्या समस्या जाणवू शकतात. इतकेच नव्हे तर पोटाच्या आजाराने त्रस्त असाल आणि त्यात मेथी दाणा खाल्लात तर जुलाब होऊ शकतात.
पचनाच्या समस्येने हैराण रुग्ण (Fenugreek Seeds Side Effects)
अनेक लोकांना काहीही खाल्ले तरी पचत नाही. अशा रुग्णांनी मेथी दाणा खाल्ला तर उत्तम. पण त्याचे अति प्रमाणात सेवन केल्या पोटातील उष्णता वाढेल आणि उलट्या, जुलाब, आतड्यात सूज येणे आणि काही प्रकरणांमध्ये चक्कर येणे अशा समस्या उद्भवू शकतात.
युरिनसंबंधित समस्या असलेले रुग्ण
काही लोक युरीन संबंधित विविध आजरांनी त्रस्त असतात. (Fenugreek Seeds Side Effects) अशा लोकांना युरिनमधून घाण वास येण्याची समस्या जाणवते. तर अशा रुग्णांनी आपल्या आहारातून मेथी दाणे पूर्णपणे काढून टाकावे. अन्यथा समस्या वाढू शकतात.
त्वचेचे आजार असलेले रुग्ण
जर तुम्ही त्वचेसंबंधित कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर तुमच्या आहारातून मेथी दाणा किंवा त्याचे पाणी आधी बाहेर करा. नाहीतर आधीपेक्षा भयंकर त्रासाला सामोरे जावे लागते.
गरोदर स्त्रिया
गरोदर स्त्रिया पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी मेथीचे पाणी पितात. मात्र, मेथीच्या सेवनामुळे गर्भपात होण्याची दाट शक्यता असते. म्हणूनच गरोदर स्त्रियांनी चुकूनही आपल्या आहारात मेथी दाणा किंवा त्याचे पाणी घेऊ नये. (Fenugreek Seeds Side Effects) इतकेच नव्हे तर स्तनपान करणाऱ्या मातांनी देखील मेथी खाऊ नये. यामुळे बाळाला गॅस किंवा पोट दुखीची समस्या होऊ शकते.