औरंगाबाद | सध्या मुंबईमध्ये प्रचंड पाऊस होत आहे त्याचबरोबर काही ठिकाणी दरड कोसळत असल्यामुळे या मार्गावरील चार एक्सप्रेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. यावेळी तिकीट बुक केलेल्या सुमारे पन्नास ते साठ हजार प्रवाशांनी त्यांचे तिकीट रद्द केले होते.
हजारो प्रवासी नांदेड मुंबईवर प्रवास करतात. सध्याच्या काळात एक्सप्रेस आरक्षित असल्यामुळे अगोदरच प्रवाशांना नोंदणी करावी लागते. त्याशिवाय प्रवास करता येत नाही. मुंबई येथे चार दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाला यामुळे या मार्गावर जाणाऱ्या गाड्या थांबवण्यात आल्या होत्या. यावेळी जवळपास पन्नास हजार प्रवाशांनी नोंदणी केली होती.
आता मुंबईची परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. आता येणाऱ्या दिवसात पाऊसाचा अंदाज घेऊन प्रवासी तिकीट बुक करत आहेत. त्याचबरोबर रेल्वेच्या वतीने तिकीट रद्द केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा चार्ज करण्यात आला नाही.